Bhagirath Bhalke-Abhijeet Patil-Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil News : एक म्हणतो, ‘बिल काढायचं असेल तर पक्षात प्रवेश करा; दुसऱ्याने पक्षाची सत्ताच घालवली...’

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : विधानसभा निवडणुकीला अजून आठ महिन्यांचा अवधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे संभाव्य उमेदवार अभिजित पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आमदार समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले. या मतदारसंघासाठी आपण आक्रमकरीत्या सक्रिय असल्याचे दाखवून दिले. (Abhijeet Patil's criticism of Bhagirath Bhalke-MLA Samadhan Avatade)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळवेढा दौऱ्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. पवार व माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी आक्रमक भाषण केले. त्यामध्ये मागील सरकारने जनावरांच्या छावणीचालकांचे बिल न दिल्यामुळे छावणीचालक सध्या कर्जात अडकले आहेत. बिल देण्याऐवजी पक्षात प्रवेश करणार असाल तरच बिलासाठी मदत करतो, असे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी आमदार आवताडे यांच्यावर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ज्या पक्षात प्रवेश केला, तो पक्षही त्यांच्या पायगुणांमुळे सत्तेतून गेला, अशी टीका भगीरथ भालके यांचे नाव न घेता अभिजित पाटील यांनी केली. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणणारे नेते आज या पक्षात नाहीत. मात्र, जनता आजही पवारसाहेबांसोबत आहे. माझी उमेदवारी पंढरपुरातून जाहीर केल्यानंतर काहींनी माझ्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी असतानाही सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला. पण, मलादेखील वेगवेगळ्या माध्यमातून अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु 85 वर्षांचा योद्धा मोठ्या संकटाला तोंड देत असताना मी त्यांच्याबरोबर सगळ्या संकटांशी सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून अभिजित पाटील यांनी शरद पवार गटाबरोबर राहण्याचा ठाम निर्धार केल्याचे दिसून आले.

भविष्यात सर्वांना सोबत घेऊन या मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीचे काम प्रभावीपणे करू. लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याने त्यामध्ये पास होण्यासाठी अभिजित पाटील यांनी आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. मात्र, मंगळवेढ्यातील प्रमुख प्रश्नांवर ते तेवढे आक्रमक होताना दिसत नाहीत. फक्त वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी अधिक आक्रमक होण्याची गरज आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा दुष्काळामधील ट्रिगर वनमध्ये समावेश नाही, तो होणे गरजेचे आहे. पुढील दोन महिन्यांत कारखान्याचा गाळप हंगाम संपताना चाराटंचाई उग्र रूप घेऊ शकते. पंचायत समितीकडून नवीन विहिरींच्या मंजुरीस विलंब लागत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदांमुळे जनतेची होणारी ससेहोलपट, अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित कार्डधारक, घरकुल योजनेत सर्वसाधारण कुटुंबे वंचित असणे. उजनी मायनसमध्ये गेल्याने मंगळवेढा तालुक्यातील पाणी योजनेचे नियोजन, आरोग्य व शिक्षण खात्यातील रिक्त पदे या प्रश्नांवर आवाज उठण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT