Pawar Vs Pawar : वारंवार वय काढणाऱ्या अजितदादांना पवारांचे धारदार उत्तर; ‘ते कुठून आलेत...लक्ष देऊ नका’

Sharad Pawar Solapur Tour : कुंभारीच्या रे नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पाचे शंभर टक्के श्रेय हे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना आहे.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाबाबत वारंवार बोलत आहेत. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत, असा आरोप अजितदादांकडून होत आहे. त्याला पवारांनी सोलापुरात हसत उत्तर दिले आहे. अजित पवारांना पहिल्यांदा तिकिट कोणी दिलं. अशांकडे फार लक्ष द्यायचं नसतं, असे म्हणत शरद पवार यांनी आपण अजित पवारांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. (Sharad Pawar's reply to Ajit Dada criticizing his age)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना ‘वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत’ असा आरोप अजित पवारांनी केला आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी शरद पवार यांनी हसत उत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Ajit Pawar
Modi Solapur Tour : मोदींनी उडवली काँग्रेसच्या निवडणूक घोषणेची खिल्ली... ‘क्यों, आधी रोटी खाएंगे...’

ते म्हणाले, अजित पवार कुठून आले आहेत. त्यांना राजकारणात कोणी आणले. पहिल्यांदा तिकिट त्यांना कोणी दिलं, असे सवाल करत ‘असं किती लोकांचं सांगू.’ अशी विचारणाही पवार यांनी केली. अशा गोष्टींकडे फार लक्ष द्यायचं नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत पवार म्हणाले, मी माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी सोलापुरात आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल सोलापुरात आले होते. ते काय भूमिका मांडतात, याचे औत्सुक्य होते. कुंभारीच्या रे नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पाचे शंभर टक्के श्रेय हे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना आहे. ते आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी काम करत आहेत. बिडी कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांच्या मेहनतीचा हा प्रकल्प आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
Sangola Politics : ‘आम्हा दोन भावंडांत काहीजण कैकयीप्रमाणे भांडण लावत आहेत...’ : डॉ. देशमुखांचा रोख कुणाकडे

आडम मास्तरांचे काम विधायक आहे. विधायक काम करणारे आडम मास्तर यांच्याविषयी पंतप्रधान चार शब्द चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केले असते, तर ते शोभून दिसलं असतं. प्रत्येक ठिकाणी डावे आणि उजवी विचारसरणी करत बसले तर विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचे भूमिका बघायला मिळत नाही, ही गोष्ट चांगली झाली नाही, अशा शब्दांत पवारांनी नाराजी व्यक्त केली.

जमलेले लोक पाहून आमची लोकप्रियता आहे, असे समजून कोणी भूमिका घेतली असेल तर कितपय योग्य आहे, याचा विचार त्यांनीच करावा. मोदी यांच्या भावूक झाले, त्याबाबत मी जास्त काही बोलणार नाही. तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण बेरोजगारी, महागाईवर ते बोलले असते तर योग्य झाले असते. त्यावर न बोलता भावनिक होणे म्हणजे लोकांना मूळ मुद्यांकडून दुसरीकडे भरकटवण्यासारखं आहे, हे काही योग्य नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Ajit Pawar
Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी दिला मनोज जरांगे-पाटलांना मोलाचा सल्ला

ते म्हणाले,‘सोलापुरात औद्योगिकरण होणे गरजेचे आहे. महेश कोठे यांच्या माध्यमातून सोलापुरात एक आयटी कंपनी येते आहे. ती चांगली गोष्ट आहे. पण सरकारने ही करण्याची गरज आहे. पण, सोलापुरातील तरुण आज पुण्यात कामासाठी येत आहेत, त्यामुळे सोलापुरात औद्योगिक विकास होणे गरजचे हेाते. पण या प्रश्नाकडे मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे.’

Sharad Pawar-Ajit Pawar
Modi Solapur Tour : कामगारांना घरे देताना मोदी बालपणीच्या आठवणीने भावूक; सोलापुरात रडले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com