Vishal Phate  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

फरार विशाल फटे प्रकटला अन् म्हणाला, पोलिसांसमोर शरण येणार!

कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या गैरव्यवहाराची फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

बार्शी : अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal Phate) याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. फटे हा फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांनी (Police) विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. आज अखेर फटे हा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला. जवळच्या पोलीस ठाण्यात संध्याकाळी हजर होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

फटे याने म्हटले आहे की, मी दोनशे कोटींचा स्कॅम केला, असा आरोप होत आहे. दोनशे कोटींचा स्कॅम करणारा माणूस कशाला भारतात माशा मारत बसेल. हे सगळे पूर्वनियोजित नाही. माझ्याकडून झालेल्या चुकांना मीच जबाबदार असून, कुणाला दोष देत नाही. पळून जाण्याचा माझा विचार नाही. दोन कोटी रुपये बँक खात्यात ठेवून कुठला माणूस पळून जाईल. मी एवढ्या पैशात भारतातील कुठल्याही फाईव्ह स्टारमध्ये राहू शकतो. आज संध्याकाळी मी जवळच्या पोलीस ठाण्यात हजर होणार आहे.

मी 28 टक्के रिटर्न देण्याचे आश्वासन दिले नव्हते, असे स्पष्ट करून फटे म्हणाला की, ग्राहकांसोबत मी लेखी करारपत्र केले होते. त्यांना कोरे चेकही दिले होते. यात कुठेही 28 टक्क्यांचा उल्लेख नाही. माझ्या विरोधातील तक्रारींची कुणी शहानिशाच केली नाही. पोलिसांनी माझी बँक स्टेटमेंट काढावीत. माझ्या खात्यावरील रक्कम तपासावी. माझ्यामुळे काहींचे पैसे बुडाले असतील.

सुमारे 500 कोटींच्या फसवणुकीचा अंदाज

फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादित राहिला नसून, इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून, फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. विशाले फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे.

मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी

फटे याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी संपादन केले आहे. त्याला इंग्रजी बऱ्यापैकी बोलता येत होते. शेअर मार्केटची माहितीही त्याने जमवली होती. त्याच आधारे त्याने लोकांकडून पैसे जमवण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी काही प्रसिध्द लोकांसोबतचे फोटोही गुंतवणूक करणाऱ्यांना दाखवायचा. त्यातच त्याला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते एका माध्यम समूहाचा पुरस्कार मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT