Baliram Sathe, Ramesh Barskar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : मोहोळ राष्ट्रवादीतील वाद पेटला : निवड रद्द करताच प्रदेश चिटणीसांनी जिल्हाध्यक्षांना करुन दिली अधिकाराची आठवण

NCP News : राष्ट्रवादीच्या संघटने बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकुमार शहा

Mohol Ncp News : गेली वर्षभरा पासून मोहोळ विधानसभा मतदारसंघात खरे राष्ट्रवादीचे कोण? असा सुरु झालेला सघर्षं आता पुन्हा विकोपाला गेला असुन, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश चिटणीस तथा उस्मानाबादचे निरीक्षक रमेश बारसकर यांनी पक्षाच्या विधानसभा कार्याध्यक्ष पदी मोहोळ येथील मंगेश प्रकाश पांढरे यांची नियुक्ती केली आहे.

या निवडीचा वाद पुन्हा पेटला असुन, सदरची नियुक्ती ही पक्ष धोरणाच्या विरोधात असल्याने आपली निवड रद्द करण्यात आली, असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी काढले आहे. दरम्यान, या पत्राला उत्तर देत राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी "आपण सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाहीत. त्यामुळे मी सोलापूर जिल्हा कार्यकारणी मधील पदाधिकारी नसून, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कार्यकारणीमध्ये संघटन सचिव आहे.

त्यामुळे आपण जे पत्र काढले आहे ते वरिष्ठाच्या अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला नसून, त्याबद्दल आपल्या अधिकाराची माहिती वरिष्ठा कडून घेणे गरजेचे आसल्याचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना काढल्याने मोहोळ तालुक्यातील गेली वर्ष भर अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळुन आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संघटने बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी अनगरचा पाटील परिवार भाजपामध्ये (BJP) जाणार अशा सोशल मीडिया वरून व्हायरल झालेल्या पोस्टवरून गेली वर्षभरामध्ये तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. तर गेल्या कांही दिवसापुर्वी अनगरकरांच्या बॅनरवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो हटविण्यात आले होते. भरीस भर म्हणुन याच काळात भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनगरच्या वाड्याला भेट देत भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.

मात्र, मागील दोन महिन्या पासून पुन्हा या चर्चेला विराम मिळाला असला, तरी तालुक्यातील राष्ट्रवादी अंतर्गत अनगर व नरखेडमध्ये सुरू असलेले युद्ध मात्र आजही सुरूच आहे. दरम्यान, च्या काळात रमेश बारसकर यांनी मोहोळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन सचिव या अधिकाराने  अधिकाराचा वापर करून या अगोदर देखील सुरज जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली होती.

त्या वेळी मात्र कोणीही तक्रार केली नव्हती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या विधानसभा कार्याध्यक्षपदी पांढरे यांची नियुक्ती केल्याचे पत्र देताच या पदाला जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आक्षेप घेतला आहे. तर याच आक्षेपाला रमेश बारसकर यांनी उत्तर दिल्याने राष्ट्रवादीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT