Ajit Pawar News : 'ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले ते १०० जण कोण?'

Eknath Shinde, Ajit Pawar News : तुम्ही १०० लोकांना संरक्षण देत आहात तर त्याचा खर्च शासनावर पडतो.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातील १०० जणांना सरकारी खर्चातून संरक्षण दिले असल्याचा मोठा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच, याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असून माहिती दिली जात नसल्याचाही आरोप पवार यांनी दिला.

पवार म्हणाले ''मी माहिती अधिकारातून माहिती घेऊ शकतो. मात्र, विरोधी पक्ष नेता म्हणून मला माहिती मागण्याचा अधिकार आहे. माहिती गुप्त राहते असा काही भाग नाही. वर्षभर मी ठाणे जिल्ह्यात संरक्षण घेणारे कोण-कोण याची माहिती मागत आहे. मात्र, याची माहिती दिली जात नाही आहे. ठाणे जिल्ह्यात १०० जणांना संरक्षण दिले जात आहे. असे काय ठाणे जिल्ह्यात घडले आहे की त्यांना संरक्षण दिले जात आहे?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar
Raj Thackeray News : 'राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!'

आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींच्या जीवाला भिती असेल तर त्यांना संरक्षण देण्याचे काम आहे. मात्र, तुम्ही १०० लोकांना संरक्षण देत आहात तर त्याचा खर्च शासनावर पडतो. माझ्याकडे असलेल्या यादीमध्ये काही व्यावसायिक आहेत. या व्यवसाईकांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. तुम्ही व्यवसाय बदला, मग संरक्षणाची गरज काय आहे? पवार यांनी सांगितेल की १०० लोकांची यादी आहे. त्यात लोकप्रतिनिधी आहे. सर्वसामान्य माणसांचा जीव धोक्यात आला तर त्याला संरक्षण देणे आक्षेप नाही, असे पवार म्हणाले.

संरक्षण देणे चुकीचे नाही आहे. मात्र, आपण आता राज्यकर्ते झाले आहोत, त्यामुळे आपण आपल्या बगलबादशाहांना, सहकाऱ्यांना सरकारी पैशांनी संरक्षण देणे अजिबात योग्य नाही. सरकारी खर्चाने संरक्षण दिले असेल तर माहिती घ्या. जनतेच्या पैशांचा खर्च करणे हे कोणत्याही सरकारला शोभा देत नाही, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Abdul Sattar News : सत्तारांच्या बाबतीत असे काही घडलेच नाही, देसाईंनी स्पष्टच सांगितले

आमदार, खासदार, माजी नगरसेवक, वकिल, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेत्यांची पत्नी, बांधकाम व्यवसायिक, आरटीआयचा कार्यकर्ता, कुठल्या पक्षाचे प्रवक्ते, अमक्या शेठचा मुलगा, ऑक्सिगॅस कंपनी, एमएमआरडीएमध्ये ऑफिसर आदी व्यावसायिकांची या यादीत नावे आहेत, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com