Eknath Shinde-Pandit Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandit Deshmukh Murder Case : पंडीत देशमुख खूनप्रकरणी एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा; ‘चुकीला माफी नाही, साळवींसारखे वकिल नेमू, परिणामांची पर्वा करत नाही’

Eknath Shinde Speech : पंडीत देशमुख यांच्या खूनप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचा इशारा देत दोषींना शिक्षा मिळेल आणि न्याय मिळवण्यासाठी निष्णात वकील नेमण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडीत देशमुख खूनप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होणारच असा इशारा दिला.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात शिवसेना लढत असून, गुंडशाहीऐवजी विकासराज देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
पंडीत देशमुखांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि मोहोळमध्ये विजय साजरा करूच असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Solapur, 23 November : शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडीत देशमुख खूनप्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला सजा झालीच पाहिजे आणि चुकीला माफी नाही. कोर्टात तुम्हाला ॲड हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात वकिलाची नेमणूक करण्यात येईल. येथील शिवसैनिक पंडीत देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. परिणामाची पर्वा न करता मी खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख खूनप्रकरणी दिला आहे.

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज (ता. 23 नोव्हेंबर) सोलापूरमध्ये आले होते. नगर परिषदेच्या निवडणुकीत मोहोळमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. मोहोळच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सिद्धी वस्त्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मोहोळमध्ये (Mohol) ही काय गुंडागर्दी, दहशत आणि मारामारी सुरू आहे. जनतेला निर्भपणे राहता आलं पाहिजे का नाही? आपल्याला दहशतीमध्ये राहायचंय का? मोहोळकरांना गुंडाराज पाहिजे की विकासराज पाहिजे, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

शिंदे म्हणाले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडीत देशमुख खूनप्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही. कोर्टात तुम्हाला ॲड हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात वकील पाहिजे, तर त्यांची नेमणूक आपण करू. पण येथील शिवसैनिक पंडीत देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.

अशा प्रकारची (मोहोळसारखी) गुंडागर्दी महाराष्ट्रात कोणी खपवून घेणार नाही. हा महाराष्ट्र असून पुरोगामी राज्य आहे. इथं माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ , शेतकरी सर्वजण निर्भयपणे राहिले पाहिजेत. तुम्हाला मोहोळमध्ये बदल करायचा असेल, इथं विकास करायचा असेल आणि गुंडशाहीमुक्त मोहोळ करायचे असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

मी ठरवलं तर एखाद्याच्या पाठीमागं खंबीरपणं उभा राहतो. परिणामाची पर्वा मी करत नाही. मोहोळमधील जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. पंडीत देशमुखांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. अशी गुंडागिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही शिवसेनेचे पॅनेल विजय करा, मी तीन नोव्हेंबरला मोहोळमध्ये विजयोत्सव साजरा करायला येणार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्र.१: पंडीत देशमुख खूनप्रकरणी शिंदेंनी काय आश्वासन दिले?
उ: कोणताही आरोपी सुटणार नाही आणि निष्णात वकील नेमले जातील असे त्यांनी सांगितले.

प्र.२: मोहोळमध्ये कोणाविरुद्ध निवडणूक लढवली जात आहे?
उ: शिवसेना थेट भाजपविरोधात लढत आहे.

प्र.३: शिंदेंनी मोहोळच्या नागरिकांना कोणता संदेश दिला?
उ: गुंडाराज नाकारून विकासराज निवडा असा संदेश दिला.

प्र.४: मोहोळमध्ये विजय झाल्यास काय करणार?
उ: तीन नोव्हेंबरला विजयोत्सव साजरा करायला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT