Mumbai Mathadi Melava sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mumbai Mathadi News : माथाडी कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार : देवेंद्र फडणवीस

Umesh Bambare-Patil

-राजेश पाटील

Mumbai Mathadi News : (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या माथाडी कायद्याचा आत्मा आम्ही मरू देणार नाही आणि बदलूही देणार नाही. फेक माथाडी कामगार आणि खंडणी वसूल करणाऱ्यांना जेलबंद करता आले पाहिजे, त्यासाठी माथाडी कामगार व नेत्यांनी चर्चा करून माथाडी कायद्यात योग्य ते बदल सूचवावेत. कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट Mathadi Kamgar आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी कायद्याचे जनक (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis बोलत होते.

फडणवीस म्हणाले, 'फेक माथाडी कामगार आणि खंडणी वसूल करणाऱ्यांना जेलबंद करता आले पाहिजे, त्यासाठी माथाडी कामगार व नेत्यांनी चर्चा करून माथाडी कायद्यात योग्य ते बदल सूचवावेत. कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

सिडकोच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला पाच एकर भूखंड मिळण्यासाठी पाठपुरावा करू, माथाडी कामगारांच्या शिक्षित मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयात नोकरी देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. मराठा आरक्षण प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसवून सोडविण्याचा प्रयत्न करू.

नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे ६५ हजार उद्योजक निर्माण केले आहेत, ही गौरवास्पद कामगिरी आहे'. नरेंद्र पाटील म्हणाले, 'कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी माथाडी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणताना आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते.

माथाडी कायद्यात कामगार हिताविरोधी काहीही बदल करू देणार नाही. आमची विश्वासार्हता माथाडी कामगार चळवळ आणि माथाडी कामगारांशी निगडित असून, आम्ही कामगारांशी बेईमानी कधीही करणार नाही.' माजी मंत्री गणेश नाईक, संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली.

या वेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, मंदाताई म्हात्रे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, बाजार समितीचे सभापती अशोक डक, सचिव पी. एन. खंडागळे, डॉ. हणमंतराव पाटील, रमेश पाटील, एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, अॅड्. भारतीताई पाटील राजेश नार्वेकर, अशोक शिनगारे, मंगेश मोहिते आदीसह कामगार उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT