Satara Shivendraraje Bhosale News : लंडन येथील संग्रहालयात असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं भारतात आणण्याची प्रक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फतीने सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होवून येत्या दोन ते तीन महिन्यात ती वाघनखं भारतात येतील. सातारकरांनाही ती पाहता यावीत, यासाठी ती साताऱ्यात आणण्यात येणार असून सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची सहमती दर्शवली आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील आक्रमण परतवण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. ही वाघनखे १८२४ मध्ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षांनी ती वाघनखं भारतात India परत येणार असून ती राज्याच्या विविध भागात नागरीकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात ती येणार नसल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात होती. याची दखल घेत शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी शनिवारी चर्चा केली. चर्चेत शिवेंद्रसिंहराजेंनी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने सातारा भूमी पावन झाली असून येथील अजिंक्यतारावर त्यांनी काहीकाळ वास्तव्य केले होते.
यामुळे त्यांची वाघनखं सातारकरांनाही पाहता, यावीत व ती सातारा येथील संग्रहालयात ठेवली जावीत, अशी इच्छा व्यक्त केली. यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांची वाघनखं साताऱ्यातही आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे वचन दिले.
यामुळे सातारकरांनाही इतिहासाची साक्ष असणाऱ्या ती वाघनखं पाहण्याची संधी मिळणार असून त्यासाठीची तारीख ठरल्यावर त्यासाठीचे जल्लोषी स्वागताचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाव्दारे दिली आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.