Sharad Pawar, Rajarambapu Patal News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : सांगलीत 'बापूंचे' निष्ठावंत देणार शरद पवारांना साथ

NCP News : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात अजूनही अलबेल नाही.

Amol Jaybhaye

Sangli News : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात अजूनही अलबेल नाही. दोन्ही गटांकडून कार्यकर्ते आपल्यासोबत ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी नाही. सांगली जिल्हा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे साहजिकच त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नजर आहे. जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही फौज भेदण्यासाठी स्वतः अजित पवार यांनीच सांगलीची जबाबदारी घेतली आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील (Jayant Patil) हेदेखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) शिलेदारांनी आता जुन्या जाणत्या निष्ठावंतांना साद घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या संघर्षाच्या काळात खानापूर व आटपाडी तालुक्यांतील राजारामबापू व शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांकडे भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्यात लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तेसुद्धा इतर कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. पवार यांची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याशी सांगली जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी एकनिष्ठ राहिली आहे. मात्र, खानापूर तालुक्यात युवा नेते वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुळीक यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून नुकतीच भूमिका मांडली आहे.

खानापूर, आटपाडी तालुक्यांतील लोकनेते राजारामबापू पाटील आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे गेल्या ५० वर्षांपासून घनिष्ट संबंध आहेत. राजकीय संघर्षाच्या काळात जनता पक्ष, समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस या पक्षांना दोन्ही तालुक्यांनी साथ दिली होती. १९७९ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत जनता पक्षाचे ५ पंचायत समिती सदस्य, तर काँग्रेसचा एकच सदस्य विजयी झाला होता. आताही बापू गटाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT