Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil Statement: जयंत पाटलांनी सांगितली अंदर की बात; ‘शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते निधी मिळाल्यावर पुन्हा राष्ट्रवादीत येतील’

विश्वभूषण लिमये

Solapur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी हे तात्पुरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. एका कार्यकर्त्याने मला सांगितले की, ‘साहेब सहा महिने जातो; निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत राष्ट्रवादीत येतो, अशी अंदर की बात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत सांगितली. (Activists who went to Shinde group will come back to NCP after getting funds: Jayant Patil)

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच राष्ट्रवादीच्या व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवार जयंत पाटील हे सोलापुरात आल्यानंतर पत्रकरांशी बोलत होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, शिंदे गटाची जोपर्यंत सत्ता आह. तोपर्यंत काही सोयी सवलती मिळतील; म्हणून काही कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत. शिंदे गटात गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही. कारण, एका कार्यकर्त्याने मला सांगितले की, साहेब सहा महिने जातो. निधी घेऊन येतो. निधी मिळाल्यावर परत येतो, असे संबंधि कार्यकर्त्याने आपल्याला सांगितले आहे, असे स्पष्ट केले.

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत जयंत पाटील यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीत (NCP) बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत, तरीही काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू. सोलापूरमध्ये पोटनिवडणूक नाही. मुख्य निवडणूक आल्यावर हा मतदारसंघ लढविण्यावर ठरविण्यात येईल. असे सांगून गेल्या काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करणे जयंत पाटील यांनी टाळले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या भाष्यावर जयंत पाटील म्हणाले की, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे तुम्हाला (पत्रकारांना) बोलले असतील, तर मला माहिती नाही. माझ्याशी त्यांची चर्चा झालेली नाही. अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत खूप चांगले काम केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरूर मतदारसंघात आहेत, ज्यांचं तिथं चांगलं काम आहे.

नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर नामांतराला जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तीव्र नाराजी आहे. नगरचे अहिल्यादेवीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण, ‘जो बूंद से जाती है, वो हौदसे आती नही.’ या सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत. हे दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे.

देशभरात मुस्लिम शहराच्या नाव बदलाच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की देशातील आणि राज्यातील लोकं या बाबत समजून घेतील. पण, अहिल्यादेविंच्या नावाबाबत समर्थन केलं पाहिजे, त्याचा आम्ही विरोध करत नाही.

कर्नाटकात एप्रिल, मे महिन्यामध्ये नेहमी दुष्काळ परिस्थिती निर्माण होते. आपल्याकडून पाणी सोडल्याशिवाय कर्नाटकच्या लोकांना पाण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. उजनीच्या पाण्याची केलेली मागणी आजच वर्तमानपत्रामध्ये मी सकाळी वाचली आहे. उजनीच्या पाण्यासंदर्भात आपल्या वर्तमानपत्रात बातमी पाहिली आहे. हे दोन अडीच महिने जिकिरीचे जातील, जोपर्यंत पाऊस येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याचा पाण्याचा नकार कोणी देत नाही आणि देऊही नये. पण, कर्नाटक सरकारने आमच्या महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली असेल तर सरकारकडे किती पाणी शिल्लक आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येला किती पाणी आवश्यक आहे, याचा अभ्यास करून सरकार ठरवेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT