Kolhapur, 19 May : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर ठाण मांडून बसलेले कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे हे संघटनांच्या रडारवर आले आहेत. महिनाभरापूर्वी संजय शिंदे यांची बदली मुंबई येथे झाली होती. मात्र, ते पुन्हा कोल्हापुरात रुजू झाल्याने दीर्घकालीन पदस्थापनेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी 'गर्जना संघटनेने' थेट राज्य सरकारकडे केली आहे.
शिंदे यांनी गेल्या १५ वर्षांच्या कालावधीपैकी तब्बल १० वर्षांहून अधिक काळ एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर काम केले आहे. बदली होऊन काही काळी रत्नागिरीत सेवा दिली आहे. त्यानंतर त्यांची नियुक्ती कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून झाली. यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात जिल्हा पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कामं केलं आहे. अप्पर जिल्हाधिकारी पदावर तीन वर्षे काम केल्यानंतर आता पुन्हा याच पदावर पुनर्नियुक्ती झाली आहे.
एकाच अधिकाऱ्याला एकाच जिल्ह्यात इतकी वर्षे दीर्घकालीन पदस्थापना देण्यामागे गौडबंगाल काय? असा सवाल गर्जना संघटनेने उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर अवघ्या ४३ दिवसांत पुन्हा त्याच जिल्ह्यात आणि त्याच खुर्चीवर आणण्यासाठी कोणाचा राजकीय वरदहस्त लाभला? असा सवाल उपस्थित होत आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाच्या अनेक अधिकाऱ्यांना डावलून शिंदे यांनाच पुन्हा कोल्हापूरच्या संवेदनशील जागेवर बसवण्याचे निकष काय होते? गुप्तता' आणि विसंगती पाहता यात पारदर्शकता का राखली गेली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, बदली झाल्यानंतर शिंदे यांनी कोल्हापुरातील मंत्री, आमदार यांची सातत्याने भेट घेतली आहे. शिवाय कोल्हापुरात येणाऱ्या मंत्र्यांची भेट घेणेदेखील त्यांनी सोडलेले नाही, त्यामुळे एकाच जिल्ह्यात तब्बल १० वर्षे काम करणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.