Nashik MLC Election : छगन भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक; शिवसेनेकडून दराडे उमेदवार राहिल्यास भाजपचं पारडं पडेल जड

Chhagan Bhujbal Role Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून दराडे उमेदवार राहिल्यास छगन भुजबळ यांची भूमिका निर्णायक ठरेल असे एकंदरीत दिसत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.
Chhagan Bhujbal, Narendra Darade,
Chhagan Bhujbal, Narendra Darade,Sarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक विधानपरिषद मतदार संघाची देखील निवडणूक होणार असल्याने असल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने या जागेवर दावा सांगितला आहे. शिवसेनेत संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, नरेंद्र दराडे हे प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत दराडे यांना उमेदवारी मिळाल्यास पक्षीय बलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत (२०१८) शिवसेनेचे नरेंद्र दराडे या जागेवर विजयी झाले होते. त्यामुळे याही वेळेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी या जागेवर शिवसेनेचाच दावा सांगितला आहे. शिवाय दराडे यांनी शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करताना उमेदवारीचा शब्द घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महायुतीत शिवसेनेला जागा मिळाली, तर दराडे हेच उमेदवार असू शकतील. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Chhagan Bhujbal, Narendra Darade,
MLC Election News : विधानपरिषदेचा धुराळा : नाशिकमध्ये पुन्हा ‘दराडे पॅटर्न’? भाजप-शिवसेना समीकरणांवर सगळ्यांची नजर

तर भाजपचे पारडे जड

भुजबळ व दराडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्र भूमिका घेतल्यास निकाल बदलू शकतो. याउलट महायुतीचा एकच उमेदवार असल्यास विजय सोप्पा राहणार आहे. भाजप -शिवसेना अशी लढत झाल्यास दराडे यांच्यासोबत भुजबळांचे असलेले वैर पाहाता भुजबळांचे बळ भाजपमागे राहील, त्यातून भाजपच्या उमेदवाराचे पारडे जड पडेल.

तर गिते विरुद्ध दराडे

भाजपने अद्याप उमेदवारी बाबत मौन बाळगले असले तरी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी शड्डू ठोकल्याचं सांगितलं जात आहे. अशा स्थितीत ही निवडणूक भाजपचे गणेश गिते विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यात होईल. दराडे यांच्यासोबत असलेले वैर पाहाता भुजबळांची साथ गणेश गितेंना मिळेल. त्यातून निकालाचे चित्र बदलू शकते असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Chhagan Bhujbal, Narendra Darade,
Sunetra Pawar MLC Election : सुनेत्रा पवारांचा निर्णय ठरणार ‘पॉवर की’; अहिल्यानगर विधान परिषद जागेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच

असा आहे इतिहास

नाशिक विधान परिषदेत १९९४-९५ मध्ये अपक्ष शांतारामतात्या आहेर निवडून आले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास पिंगळे यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला. पिंगळे खासदार झाल्यानंतर डॉ. वसंतराव पवार निवडून आले. सलग दुसऱ्यादा त्यांनी विजय मिळविला. डॉ. पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव विजयी झाले. दीड वर्षाची टर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने श्री. जाधव यांना संधी दिली. शिवसेनेचे ॲड. शिवाजी सहाने यांच्याशी झालेल्या लढतीत दोघांना समान मते मिळाल्याने लाॅटरी काढण्यात आली. त्यात जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. जाधव यांच्या विजयाला सहाने यांनी न्यायालयात आव्हान दिले.

त्यानंतर २०१८ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे नरेंद्र दराडे विजयी झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहाने यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. २०२४ मध्ये मुदत संपली होती. मात्र, महापालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने निवडणूक घेतली गेली नाही. महापालिका, पालिकांच्या निवडणुका झाल्याने आता ही निवडणूक जाहीर झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com