Omraje Nimbalkar-Aditya Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aditya Thackeray On Omraje : आदित्य ठाकरेंनी ओमराजेंच्या चॅलेंजचा विषय तीनच वाक्यात संपवला; म्हणाले, ‘पळपुटे, फालतू गोष्टी...’

Solapur Drought Tour : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंबादास दानवेंना २०२९ मध्ये धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. दानवेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निंबाळकरांनी जनतेतून निवडणूक लढण्याचे आव्हान केले.

विश्वभूषण लिमये

Solapur, 26 September : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंबादास दानवे यांना दिलेल्या आव्हानावरून आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दानवेंना दिले होते.

आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत, ‘फालतू गोष्टी बाजूला ठेवा आणि आमच्यासारखं शेतकऱ्यांच्या बांधावर जा, असा टोला लगावला. आम्ही सध्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी फिरत आहोत, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पळपुटे कसली चॅलेंज देत आहेत, अशा लोकांकडे आम्ही लक्षही देत नाही. महाराष्ट्राच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी या वादाला फारसं महत्त्व देत नसल्याचं स्पष्ट केलं.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे जाऊन आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यात सोलापूरसह मराठवाड्यातील विविध भागांचा समावेश आहे. सोलापुरातील पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे, आपण केलेली दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होती, हे पाहावे लागेल

मदत नीट मिळाली नाही तर यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणार नाही. काही शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आदित्य ठाकरेंना सांगितल्या. दुष्काळ जाहीर करण्यातून एकही शेतकरी वगळू नका, पाहणी केलेला गाव वगळल्याचं गावकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना सांगितलं

शिवसेनेकडून स्वतंत्र पंचनामे करा. सरकारची योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचते, हे पहा, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या. आमचं सरकार सहा वर्षांपूर्वी होतं, आता आपण सहा वर्ष पुढ आलेलो आहोत, सुपर एल निनो आहे. तुमची मदत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली नाही. खरी मदत जाहीर करा, पारदर्शक बोला आणि स्पष्ट बोला, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

ते म्हणाले, एक महिन्यापासून आम्ही मागणी करत होतो. आज अखेर दुष्काळ जाहीर झाला आहे. कोरड्या दुष्काळाची अंमलबजावणी कशी होणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. कोणत्या पद्धतीचा दुष्काळ जाहीर केला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगावी.

दुष्काळासंदर्भात मदत कशी करणार, हे सांगणे गरजेचे आहे. अल निनोचे संकट हे कोविड महामारीसारखे आहे. पूर्वीच्या दुष्काळासारखा हा दुष्काळ नाही.. याचा परिणाम एमआयडीसी, शहरी भागांवर होणार त्याचं य करणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले, 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. सॅटेलाईट इमेजवर दुष्काळ बघून चालणार नाही किती लोकांना आणि किती वेळेत मदत मिळणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोविड काळात कशा पद्धतीची मदत होत आहे, हे उद्धव ठाकरे सांगत होते. आता शेतकऱ्यांच्या हातात काय पोहोचणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT