Gokul election : 'गोकुळ'वर मुश्रीफांचाच 'पावर गेम'! यड्रावकरांची राष्ट्रवादीकडून लॉटरी; भाजप तिसऱ्या स्थानावर!

Gokul election NCP Yadravkar news : गोकुळच्या राजकारणात मुश्रीफ यांचे वर्चस्व कायम असल्याची चर्चा आहे. यड्रावकरांना राष्ट्रवादीतून संधी आणि भाजपच्या स्थानाबाबत जाणून घ्या.
Gokul Dairy Election
Gokul Dairy ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण इर्षेला पेटले आहे. अशातच जागा वाटपावरून आणि त्याच्या फार्मूला वरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष टोकाचा बनत चालला आहे. त्यामुळे विरोधकांच्या ताकतीचा अंदाज घेऊन महायुतीने वज्रमुठ बांधून नुकतीच बैठक घेत जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात ठेवला आहे.

रविवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जात असून त्याच्या अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ठेवला जाणार आहे. जागावाटमाच्या प्राथमिक टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच गोकुळमध्ये मोठे भाऊ ठरणार असून दोन नंबर शिवसेना तर तिसऱ्या स्थानावर भाजप असणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने सरकारनामाशी बोलताना दिली आहे.

Gokul Dairy Election
Trigger 1 Drought Calculation : दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरलेले 'ट्रिगर 1' म्हणजे काय? तुमचा फायदा होणार की नुकसान? 5 मिनिटांत समजून घ्या संपूर्ण गणित!

राज्यात भाजप मोठा भाऊ असल्याने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ ठरावा अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिल्याच बैठकीत ज्याचे ठराव अधिक त्यावरच जागा वाटपाचे सूत्र ठरेल, अशी घोषणा केली होती.

मात्र त्याला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला. पक्षनिहाय जागावाटपाचे सूत्र असावे असे मागणी भाजपच्या नेत्यांची होती. त्यामुळे सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाची धुसफूस महायुतीमधून समोर आली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे यांचे बैठक मुंबईत झाल्यानंतर बहुतांश जागा वाटपाचे सूत्रावर तोडगा निघाला.

त्यानुसार उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक कोल्हापुरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पार पडली. झालेल्या बैठकीत ज्याचे ठराव अधिक, जो सभासदांची वस्तुस्थिती दाखवील त्यानुसार जागावाटप करण्याचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार येत्या रविवारी पुन्हा एकदा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. बैठकीतील सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला गोकुळ मधील 25 पैकी दहा जागा वाट्याला येणार असल्याची माहिती आहे.

त्यातील एक जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाला जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार यड्रावकर आणि मंत्री मुश्रीफ यांची आघाडी राहिली आहे. त्याचबरोबर ठराव दाखल करत असताना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांनी काही ठराव जमा केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच आमदार यड्रावकर यांना जागा निश्चित समजली जाते.

Gokul Dairy Election
Drought Declared : बळीराजासाठी मोठी बातमी! दुष्काळ जाहीर होताच शेतकऱ्यांना मिळणार 'या' 12 सवलती; वाचा सविस्तर!

तर दोन नंबरला गोकुळ मधील महायुतीतील जागा या शिवसेनेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेकडून सर्वाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे ठरावानुसार सेनेला सात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तिसऱ्या स्थानावर भाजपला सहा जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची माहिती 17 ने दिली तर जनसुराज्य शक्तीला उर्वरित दोन जागा देण्याचा फॉर्मुला निवडणुकीमध्ये ठरला आहे. तर नियुक्त तीन संचालकांमध्ये प्रमुख तीन पक्षात विभागणी होणार असल्याची देखील माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com