Gokul Dudh Sangh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : ‘गोकुळ’वर उद्यापासून प्रशासक : महाडिक घराण्याकडे जाणार महत्वपूर्ण सूत्रं?

Kolhapur Political News : गोकुळ दूध संघाच्या संचालकांची मुदत संपत असल्याने नव्या कायद्यानुसार प्रशासक नियुक्त होणार आहे. प्रशासक नको म्हणणाऱ्या संचालकांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 04 May : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्ताधारी संचालकांची मुदत उद्यापासून (05 मे) संपत आहे. नव्या कायद्यानुसार उद्यापासून गोकुळ दूध संघावार प्रशासक येणार आहे. त्यामुळे गेली अनेक दिवस संघावर प्रशासक नको; अशी भूमिका घेणाऱ्या संचालकांना धक्का बसणार आहे. प्रशासक नियुक्तीचे आदेश आज (ता. ०४ मे) सायंकाळपर्यंत निघण्याची शक्यता आहे.

संघावरील प्रशासक एक सदस्यीय की बहुसदस्यीय, तसेच राजकीय व्यक्तींची नियुक्ती होणार की सरकारी वरिष्ठ अधिकारी प्रशासक येणार, याचीही उत्सुकता आहे. प्रशासकीय प्रशासक असल्यास तीन अधिकाऱ्यांची वर्णी लागू शकते. अप्रशासकीय असल्यास महाडिक घराण्यातून एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी आपली वर्णी प्रशासक मंडळात लागावी, यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यामार्फत या इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर सर्किट बेंचने १२०८ संस्थांविरोधातील याचिकेचा निर्णय लागेपर्यंत संघाची निवडणूक न घेण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. सहकार कायद्यात संचालक मंडळाची मुदत ज्यादिवशी संपेल, तेव्हापासून संस्थेवर प्रशासक नियुक्ती केली जाईल, अशी नवी तरतूद केली आहे. त्यामुळे उद्या (ता. ४) प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी होतील.

तीन सदस्यांचे प्रशासक गोकुळ दूध संघावर नियुक्त होण्याची शक्यता आहे. त्यात अध्यक्ष म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी, तर दुग्ध विभागाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांचा समावेश असेल. राजकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचे ठरल्यास शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य या पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT