संगमनेर ( अहमदनगर ) : भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर नुकतेच मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झाले. यात महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय यांनी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा राजकीय संदेश दिला. जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. Advice to Yuvamorcha activists: Be loyal to the party without being a person worshiper
श्रीकांत भारतीय म्हणाले, भाजप हा देश प्रथम मानणारा पक्ष असून, देशासाठी जनसंघाचे विलनीकरण जनता पक्षात केले. हा इतिहास आहे. वर्तमानात पण कृषी विधेयक मागे घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी केले होते देशासाठी मागे घेतो. हे सांगणारे भाजप आहे. आजचा युवा मोर्चा उद्याचा भाजप आहे असे पूर्वी म्हणत. मात्र आजचा युवा मोर्चा आजचाच भाजप आहे. व्यक्तिपूजक न होता पक्षनिष्ठ होण्याचा सल्ला, श्रीकांत भारतीय यांनी दिला.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, देशासाठी पार्टी अन पार्टीसाठी कार्यकर्ता हे फक्त भाजपमध्ये आहे. इतर पक्ष पैशातून सत्ता अन सत्तेतून पैसा असे सूत्र असणारे आहेत. कार्यकर्त्यांची दिशा अन दशा बदलविण्याची ताकद प्रशिक्षण वर्गातून होते असे सांगितले.
भाजप हा एकमेव पक्ष कार्यकर्त्यांचा असून इतर पार्टी कोणाच्या तरी खाजगी मालकीच्या आहेत. बैठका, प्रशिक्षण वर्ग हा आपला पाया असल्याचे भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी सांगितले.
आमदार अतुल भातखळकर, प्रदीप पेशकार, देवेंद्र पै, संजय कौडगे, निधी कामदार, गणेश खणकर आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी प्रा.भानुदास बेरड, नितीन दिनकर, जालिंदर वाकचौरे, सोनाली नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, बंडूकुमार शिंदे, ऋषिराज खर्डे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.