Ahmednagar Politics : राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असल्याने जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पोहचत नाही. एक जिल्हाधिकारी, एक पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात सर्वदूर पोहचत नाही. म्हणून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकर असे नामांतर करावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे.
मी पालकमंत्री असल्यापासून माझी हीच मागणी होती. ही विभाजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना इतर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय आल्याने अहमदनगरच्या विभाजनाचा विषय मागे पडला आहे. पण आता पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच, ज्यावेळी राज्यात जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला जाईल त्यावेळी अहमदनगरला प्राधान्य असेल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.
अहमदनगरच्या जिल्ह्याच्या विभाजनासाठी ८०० कोटी प्रस्ताव सादर केला होता. विभाजनाबरोबर नामांतराचा प्रश्नही पुढे येत आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव या जिल्ह्यात आहे. त्यांनी अनेक वर्षे या जिल्ह्यात काम केले. त्यांनी सर्व समाजाच्या उद्धाराचे काम केले. बारा ज्योर्तीलिंगांचा जीर्णोधारही केला. गावोगावी धर्मशाळा, नदींच्या काठावर घाट बांधले. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी सर्व समाजाची भावना आहे.
पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांचा जिल्हा विभाजनाला विरोध आहे. याबाबत बोलताना राम शिंदे म्हणाले. राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी जिल्ह्याच्या विभाजनाला पाठिंबा दिला होता. आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अहमदनगरच्या विकासासाठी जिल्ह्याचे विभाजन महत्वाचे आहे. पक्षाकडून सूचना आल्यानंतर सर्वजण होकार देतील. त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, लोकप्रतिनिधींचा सर्व पक्षीयांची भूमिका विचारत घेऊनच नामांतर प्रक्रिया केली जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.