Rahul Gandhi On RSS : ''आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि...''; राहुल गांधींनी पु्न्हा भाजप,संघाला डिवचलं

Rahul Gandhi News: २१ व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहे का?
Rahul Gandhi, rss , bjp
Rahul Gandhi, rss , bjp Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On RSS News : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. मात्र, या यात्रेदरम्यान त्यांनी सातत्याने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंही गांधी यांच्यावर भाजपनं जोरदार टीका केली होती.

आता राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपला डिवचलं आहे. त्यांनी आधुनिक काळातले कौरव हे हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात असं विधान केलं आहे. संघाची तुलना कौरवांशी केल्यामुळे राहुल गांधी आणि भाजप यांच्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी हे सध्या हरियाणात आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. गांधी म्हणाले, २१ व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहे का? आधुनिक कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश सुध्दा आहेत अशी बोचरी टीका गांधी यांनी यावेळी केली आहे.

Rahul Gandhi, rss , bjp
Supreme Court News : सत्तासंघर्षावरील सुनावणीत काय होणार? अॅड. सरोदेंनी व्यक्त केले वेगळेच मत

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका, ते कधीही हर हर महादेव घोषणा देत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र, हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला चढवित आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने दूर केलं असून फक्त जय श्रीरामचा नारा देत दहशत निर्माण केली आहे. ही लोकं भारतीय संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत असा हल्लाबोलही गांधी यांनी यावेळी केला आहे.

Rahul Gandhi, rss , bjp
ACB ची नोटीस येताच आमदार देशमुखांचा खळबळजनक आरोप; थेट मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा

तीन अब्जाधीशांच्या शक्तीनं पंतप्रधान मोदींना....

देशात नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी या दोन तीन अब्जाधीशांच्या शक्तीनं पंतप्रधान मोदींना करायला भाग पाडलं. कुणासाठी या सगळ्या करण्यात आल्या आणि कुणाविरोधात हे झालं हे लक्षात घ्यायला हवं अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com