Jaykumar Gore, Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : कै. हिंदुराव नाईक निंबाळकरांनंतर आमदार गोरेच माण, खटावचे जलनायक : खासदार निंबाळकर

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan Political News : दुष्काळी माण-खटाव तालुक्यांना वरदायी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर आदी सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कै. खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी विविध आंदोलने, पदयात्रा काढत या सिंचन योजनांसाठी पाया रचला, तर त्यावर कळस चढवत योजना मार्गी लावत शिवारात पाणी पोचवण्याचे काम माण, खटावचे जलनायक आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे, असे मत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

बिजवडी (ता. माण) Maan News येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनविकास आघाडीने दहा जागा जिंकल्याबद्दल नूतन सरपंच राधिका शिनगारे व सदस्यांचा सत्कार खासदार निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जयकुमार शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय भोसले, माण खटाव विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, तुकाराम भोसले, सोसायटीच्या अध्यक्षा रुक्मिणी भोसले, संचालक संजय भोसले उपस्थित होते.

खासदार निंबाळकर म्हणाले, 1996 ला कै. भाऊंना व 2019 ला मला खासदार करण्यात माण, खटावच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे. हे मी कदापि विसरणार नाही. या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी व आमदार जयाभाऊंनी मोठ्या ताकदीने कामाला लागलो होतो.

जिहे-कटापूरसाठी निधी कमी पडत होता. त्यावेळी आमदार जयाभाऊ, राहुल कुल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेलो. त्यांना कै. लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेला निधी कमी पडतोय हे सांगितल्यानंतर त्यांनी योजना समजून घेऊन तत्काळ भरीव निधी दिला. त्यामुळे आता तुमचा भागही पाण्यापासून वंचित राहत नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या फलटण-सांगली रस्त्यासाठी मोठा निधी दिला असून, त्याचेही टेंडर निघाले आहे. तेही काम प्रगतिपथावर असून, लवकरच ते सुरू होत आहे. म्हसवड व नाईकबोमवाडी या तुमच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या एमआयडीसीतून रोजगार उपलब्ध होणार आहे. Maharashtra Political News

बिजवडीशी कै. भाऊंचे विशेष नाते होते. तुम्ही माझ्यावरही पोरासारखं प्रेम केलेय त्यामुळे येणाऱ्या काळात या गावासाठी भरीव निधी देणार आहे. आपल्या लोकांशी संवाद साधता यावा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात म्हणूनच आपण या दौऱ्यावर आल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT