CM Eknath Shinde in Dare Villege
CM Eknath Shinde in Dare Villege sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : सहा महिन्यांनी मुख्यमंत्री दरे गावात; काय घोषणा करणार याची उत्सुकता...

Umesh Bambare-Patil

सातारा : तब्बल सहा महिन्यानंतर दरे या आपल्या मुळगावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विशेष हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यांच्या आगमनाने तेथील ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण असून आपल्या गावासाठी मुख्यमंत्री काय जाहीर करणार याची भूमिपूत्रांना उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल सहा महिन्यानंतर आपल्या दरे गावात मुक्कामी आले आहेत. ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांचे दरे गावात मोठ्याप्रमाणात स्वागत करण्यात आले होते. आज ते विशेष हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत.

त्यांची ही दोन दिवसांची सदिच्छ भेट असून त्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांत उत्सुकता आहे. दरे परिसर हा तसा मागास राहिलेला भाग आहे. या या भागासाठी एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या आहेत. आता नवीन कोणती घोषणा करणार याची गावकऱ्यांना उत्सुकता आहे. शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी दरे ग्रामस्थांनी मोठी तयारी केली आहे.

याविषयी ग्रामस्थांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, खूप दिवसांनी एकनाथ शिंदे साहेब गावांत दाखल झाले आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे. येथील रस्ते, पुलांची कामे साहेबांनी मार्गी लावली आहेत. तसेच शिक्षणाच्या सोयीसाठी ते शिक्षण संस्था सुरू करत आहेत. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी स्कुबा डायव्हींगची सोय करणार आहेत. या भागाच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT