Sharad Pawar-RadhaKrishna Vikhe Patil-bharat gogawale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation & Pawar : विखे पाटलांनंतर शिंदेंच्या मंत्र्यानेही मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना जबाबदार धरले

Radhakrishna Vikhe Patil, Bharat Gogawale Statement : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील आणि भरत गोगावले यांनी निशाणा साधल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत नागणे

Pandharpur, 04 September : मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार जबाबदार आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पवारांवरच निशाणा साधला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून नवीन राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत.

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले शुक्रवारी (ता. 4 सप्टेंबर) पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करत मराठा आरक्षणाच्या आज मुद्याला शरद पवार यांना कारणीभूत ठरवले आहे.

शरद पवारांनी पूर्वीच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. जुन्या काळात फारशा अटी आणि शर्ती नव्हत्या. त्यावेळी निर्णय घेतला असता तर आज मराठा समाजाला फायदा समाजाला झाला असता, असा दावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला १९९४ चे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर ही वेळच आली नसती, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यावर आज मंत्री भरत गोगावले यांनीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत पवारांनी त्याकाळी मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे होते, अशी टिप्पणी केली.

मंत्री गोगावले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकार कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देईल. त्यासाठी तज्ज्ञ मंडळी काम करत आहेत. हैद्राबाद आणि सातारा गॅझेटवरही काम सुरू आहे.

रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिल देणे बाकी आहे.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राला 3 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम केंद्राकडे आहे. सुमारे 3 हजार कोटींची रक्कम आल्यावर अनेक योजनेतील बिल दिली जातील, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण प्रथमच पंढरपूरला आलो आहोत. अनेक कार्यकर्त्यांनी आपण पालकमंत्री व्हावे; म्हणून विठ्ठलाला नवस केले होते. त्यासाठीच आज आपण दर्शनासाठी आलो आहे. आपल्या पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते काहीही बोलतात. पण, पालकमंत्रिपदाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणली; म्हणूनच मला पालकमंत्रिपद मिळाले. त्यामुळे कुणी काहीही बोलले, तर त्यांचे तोंड बंद करू शकत नाही. त्यामुळे जो दिया उसका भला... न दिया उसका भी भला असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

या वेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके,साईनाथ अभंगराव,अरूण कोळी, धनंजय काळे, समाधान काळे, सी.पी.बागल,संदीप मांडवे,संजय बंदपट्टे, सत्यवान मोरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT