सातारा : शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना माझे विनम्र अभिवादन आहे, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाबळेश्वरला मुक्कामी असून त्यांनी प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला. यावेळी त्यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास त्यांनी भेट दिली. शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना माझे अभिवादन आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथील सनसेट पॉईंटला भेट दिली. यावेळी त्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लहान मुलांशी संवादही साधला. दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेल एअर रेड क्रॉस संचलित महाबळेश्वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी फादर टॉमी, चेअरमन जयसिंग मरिवाला, सुपरिटेंडेंट डॉ. पंडीतराव देशमुख आदी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चौकशी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.