राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडूनही ‘जय श्रीराम’चा घोष

नाशिकच्या काळाराम मंदिराला राज्यपालांनी भेट देऊन दर्शन घेतले.
Governer Bhagatsingh Kosjiyari & Chhagan bhujbal
Governer Bhagatsingh Kosjiyari & Chhagan bhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्सच्या (MCCIA) कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshiyari) यांनी रविवारी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह श्री काळाराम मंदिरास भेट देऊन श्रीरामाचे (Shreeram) दर्शन घेतले. राज्यपालांनी विश्‍वस्तांच्या उपस्थितीत ‘जय श्रीराम’चा नाराही दिला. त्यानंतर राज्यपालांनी विश्‍वस्त मंडळाकडून मंदिराचा इतिहासही समजावून घेतला.

Governer Bhagatsingh Kosjiyari & Chhagan bhujbal
हिदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालीसाचे पठण!

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल कोश्‍यारी यांनी आज सकाळी साडेसातला श्रीराम मंदिरात प्रवेश केला. त्या वेळी पालकमंत्री भुजबळ, आमदार ॲड. राहुल ढिकले आदींसह विश्‍वस्त उपस्थित होते. विश्‍वस्तांनी राज्यपाल, पालकमंत्र्यांचे स्वागत केल्यावर राज्यपालांनी जय श्रीरामच्या जयघोषात श्रीरामाचे दर्शन घेतले.

Governer Bhagatsingh Kosjiyari & Chhagan bhujbal
भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागितली

दर्शनानंतर विश्‍वस्तांच्या हस्ते राज्यपाल व पालकमंत्र्यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांनी मंदिराच्या बांधकामाविषयी विश्‍वस्तांकडून माहितीही जाणून घेतली. विश्‍वस्त मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी, धनंजय पुजारी, शांताराम अवसरे, ॲड. दिलीप कैचे, ॲड. दत्तप्रसाद निकम, मंगेश पुजारी आदी उपस्थित होते.

विकासनिधी मिळवून देऊ

राज्यपालांनी श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर विश्‍वस्त मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत राज्यपालांना मंदिर विकास आराखडा मंजूर व्हावा, देवस्थानला पर्याप्त निधी उपलब्ध व्हावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आल्याचे जानोरकर यांनी सांगितले. या वेळी राज्यपालांनीही सकारात्मकता दाखवत केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून मंदिराच्या विकासासाठी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन उपस्थित विश्‍वस्त मंडळाला दिले.

प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com