Dhangar Reservation Protest in Khambataki Ghat : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation News : सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, आता 'अडवू खंबाटकी घाट, लावू सरकारची वाट' ; धनगर समाजाची हाक..

Dhangar Reservation Protest in Khambataki Ghat : 'उपोषणकर्त्यांना दिलेले आश्वासन अखेर हवेत विरून गेले..'

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेले आमरण उपोषण आज (20 सप्टेंबर) पंधराव्या दिवशीही सुरू आहे. शनिवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीत येत्या दोन दिवसात धनगर आरक्षणावर मुंबईत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे उपोषणकर्त्यांना दिलेले आश्वासन अखेर हवेत विरल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

आश्वासन दिल्यानंतर चार दिवस उलटले तरीही सरकारच्या वतीने या संदर्भात कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. दरम्यान, राज्यभरातील धनगर समाजाच्या नेत्यांनी चौंडी येथे तीन दिवसांपूर्वीच एक बैठक आयोजित करून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज (20 सप्टेंबर) "अडवू खंबाटकी घाट, लावू सरकारची वाट" अशी हाक देत सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटामध्ये समाजाच्या वतीने भव्य असा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील जवळपास 25 ठिकाणी रास्तारोको केला जाईल, असं सांगण्यात आलेला आहे.

दरम्यान यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी आंदोलक पंधरा दिवस उपोषणावर असताना सरकार याची दखल घेत नाही. पालकमंत्री भेट देत नाहीत. सरकार बलिदानाची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. काल बुधवारी उशिरापर्यंत सरकारकडून कोणतीही चर्चेची सूचना न आल्यामुळे आज राज्यभर खंबाटकी घाट या सह राज्यातील ठीक ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने सरकारचे विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

दरम्यान, नगरमध्ये उपचारार्थ दाखल केलेले उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे, तर अजून एक उपोषण करते चौंडी येथे उपचार घेत आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

चौंडी बरोबरच पाथर्डी तालुक्यातील मिरी या ठिकाणीही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक जणाची तब्येत बिघडली असल्याने त्या उपोषणकर्त्याला सलाईन लावण्यात आलेले आहे.

Edited by - Chetan Zadpe

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT