NCP Activist Challenge To Padalkar : गोपीचंद पडळकरांनी सोलापुरात येऊन दाखवावं; राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे ओपन चॅलेंज

Solapur NCP Aggressive : भाजप हा सुसंस्कृत पक्ष असतानाही पडळकर हे भाजपची संस्कृती बिघडविण्याचे काम करत आहेत, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
Gopichand Padalkar-Ajit Pawar
Gopichand Padalkar-Ajit PawarSarkarnama

Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सोलापुरातील एका कार्यकर्त्याने तर पडळकरांनी सोलापुरात येऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. तसेच एकाने चक्क अजित पवारांच्या आवाजात पडळकरांना सुनावले. (Gopichand Padalkar should come and show in Solapur : NCP activist open challenge)

धनगर आरक्षणासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले नाही, त्याबाबत विचारले असता अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, अशी टीका केली होती. त्याचा आमदार अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पडळकरांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

Gopichand Padalkar-Ajit Pawar
Wadettiwar On Padalkars: पडळकरांना अजितदादा हे सिंह असल्याचे दाखविण्याची वेळ; वडेट्टीवारांचा निशाणा नेमका कोणावर?

आमदार पडळकर यांचा सोलापुरातील भैया चौकात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकरांची पिल्ले आणून त्यांचं गोपीचंद पडळकर असं नामकरण करत निषेध केला आहे. सत्तेत एकत्र असूनही पडळकरांनी वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप हा सुसंस्कृत पक्ष असतानाही पडळकर हे भाजपची संस्कृती बिघडविण्याचे काम करत आहेत. ते सुधारणार नाहीत, त्यामुळे त्यांचे नामकरण अशा प्रकारे करण्यात आले आहे, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे संजय सरक या कार्यकर्त्याने अजित पवार यांचा हुबेहूब आवाज काढत पडळकरांचा समाचार घेतला. ज्यांना आपलं डिपॉझिट वाचवता आलं नाही, त्यांच्याबाबत मी जास्त बोलत नाही. अशा लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे अस्सल अजितदादा स्टाइलमध्ये सरक यांनी सुनावले आहे.

Gopichand Padalkar-Ajit Pawar
Fadnavis Advice To Padalkar : पडळकरांनी अशा भाषेचा उपयोग करू नये; अजित पवारांबाबतच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया

केगावमधील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षाने तर आमदार गोपीचंद पडळकर यांना सोलापुरात येऊन दाखविण्याचे आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्याबाबत गोपीचंद पडळकर हे वारंवार खालच्या पातळीवर टीका करत आहेत. पडळकर तुम्ही झिरो आहात, हिरो बनण्याचा नाद करू नका. तुम्ही सोलापुरात कसे फिरता, हे आम्ही बघतो. सोलापूर जिल्ह्यात तुम्ही कसे येता, हे आम्ही आता बघतोच, असे आव्हान अजित पवार समर्थकाने दिले आहे.

पडळकरांच्या गाडीवर २०२१ मध्ये झाला होता हल्ला

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या पडळकर यांच्या गाडीवर २०२१ मध्ये दगड फेकण्यात आला होता. आता पडळकरांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; अन्यथा सोलापुरात फिरणे मुश्कील होईल, असा इशारा दिला आहे.

Gopichand Padalkar-Ajit Pawar
Solapur Loksabha : प्रणिती शिंदेंच्या लोकसभा उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार; सुशीलकुमार शिंदेंनी घेतलं मनावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com