Shivsena Minister Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan News : पाटण तालुक्‍यात कृषी महाविद्यालय उभारणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या ३७ वा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-अरूण गुरव

Patan News : पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या प्रगतीसाठी (कै.) आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्‍नशील आहे. पाटण तालुक्यात लवकरच कृषी महाविद्यालय उभारणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

दौलतनगर (ता. पाटण) Patan येथे लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शिवाजीराव देसाई यांच्या ३७ वा पुण्यतिथी कार्यक्रमात शंभूराज देसाई Shambhura Desai बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, डॉ. दिलीपराव चव्हाण,‌ पाटण बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, विलास गोडाबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘कारखान्याची उभारणी करताना लोकनेते सत्तेमधून बाहेर गेले, तरीही खडतर परिस्थितीत आबासाहेब यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला.’’

मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक केंद्रात प्रथम, द्वितीय, तृतीय व विविध स्पर्धा त उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंग नलावडे यांनी प्रास्ताविक केले. बबनराव शिंदे यांनी आभार मानले.

कोयना शिक्षण संस्थेत कारस्थान केले..!

के. व्ही. बापू पाटील, भगवतराव देसाई, लोकनेते देसाई यांनी कोयना शिक्षण संस्था उभारली आणि काही लोकांनी त्यांना या संस्थेतून बाहेर काढले. काही लोकांनी स्वतःच्या ताब्यात कोयना शिक्षण संस्था घेतली. राजकारण कटकारस्थान करून कोयना संस्था ताब्यात घेतली. म्हणून आम्ही जिद्दीने मोरणा संस्था काढून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडून दिली, असा टोला मंत्री देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे नाव न घेता लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT