Patan News : स्वत:चे घर जळतंय, त्याकडे लक्ष द्या...एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज (शनिवार ता.१३) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) Patan येथे झाला.
Udhav Thackeray, Eknath Shinde
Udhav Thackeray, Eknath Shindesarkarnama

-हेमंत पवार

Patan CM News : स्वत:चे घर जळतंय, त्याकडे लक्ष द्या, ते वाचवा. दुस-याचे घर जळतंय यात कसला आनंद व्यक्त करताय, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' असा टाोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामाोल्लेख टाळून लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळे दिवाने झालेत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज (शनिवार ता.१३) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) Patan येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, एका राज्याच्या निवडणुकीवरुन इतर निवडणुकांची तुलना करत येत नाही. पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृ्त्वाखाली भाजप-शिवसेनाच सत्तेत येईल. राहुल गांधीची 'भारत जोडो' यात्रा सुरु असताना मेघालय, त्रिपुरा येथे भाजपची सत्ता आली.

Udhav Thackeray, Eknath Shinde
Shambhuraj Desai News: ''आमचं 'टार्गेट' सेट,पण अजित पवारांसारखा मोठा नेता...''; देसाईंचं मोठं विधान

त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीचा देशावर परिमाण होईल, असा अनुमान करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटुन घेणयासारखे आहे. राज्यात त्याचा काहाही परिणाम होणार नाही. पराभव कोणाचा विजय कोणाचा हे जनतेला माहिती आहे.

Udhav Thackeray, Eknath Shinde
Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

स्वत:चे घर जळतंय, त्याकडे लक्ष द्या, ते वाचवा. दुस-याचे घर जळत यात असताना कसला आनंद व्यक्त करताय. त्यामुळे बेगाने शादीमे अब्दुला दिवाना असी स्थिती झाली आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

Udhav Thackeray, Eknath Shinde
Satara News : तो तर उद्धव ठाकरेंचा मुर्खपणा; मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात धरला : राणेंचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com