Nagar jillha Hospital
Nagar jillha Hospital Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अग्निकांड : त्या डॉक्टरचे निलंबन मागे तरीही कोठडीत रवानगी

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नियुक्त केली तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी ( ता. 8 ) सहा जणांवर कारवाईचे आदेश काढले होते. यात चार जणांचे निलंबन तर दोन जणांना बडतर्फ करण्यात आले होते. Ahmednagar fire case: The doctor was sent to jail even though his suspension was avoided

या कारवाईत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे व स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले होते. तर स्टाफ नर्स आस्मा शेख व चन्ना आनंत यांना बडतर्फ करण्यात आले होते. शेख व आनंत या कंत्राटी कर्मचारी होत्या. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपत आले होते.

निलंबित झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी काल ( गुरुवारी ) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेवले होते. इंडियन मेडिकल असोसिएशन व भाजपने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आज ( शुक्रवारी ) राज्यातील सर्व बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चार जणांचे निलंबन केले होते. निलंबित केलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन रद्द केले असल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालकांच्या पत्राद्वारे पुन्हा जिल्हा रुग्णालयाला कळवण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन अखेर आज रद्द झाले आहे.

जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणात पोलिस विभागाने गुन्हा दाखल करत स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना पोलिसांनी अटक केली होती. सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कर्मचारी आणि अधिकारी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता. अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यात विशाखा शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली असली तरी विशाखा शिंदे यांना कामावर हजर होता येणार नाही.

आरोपींतर्फे न्यायालयात अॅड. महेश नवले, अॅड. विक्रम शिंदे यांनी या प्रकरणात असलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या मध्ये प्रथम 304 (अ) कलम लावला होता. मात्र तो बदलून दुसऱ्या दिवशी 304 कलम लावण्यात आला होता तसेच यामधील ज्या परिचारिका आहेत त्या स्वच्छेने कामावर आल्या होत्या. त्यांचा या प्रकरणात कोणताही अपघात घडवण्याचा हेतू नव्हता अशी, बाजू मांडण्यात आली. न्यायालयाने सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेत चारही आरोपींचे जामीन फेटाळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT