Ankush Chattar, Swapnil Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar NCP News: हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना अटक

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : अहमदनगरमध्ये शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह पाच जणांना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

लहान मुलांच्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पूर्ववैमनस्याची हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या भांडणाशी संबंधित चार मुलांना चौकशीसाठी तोफखाना पोलिसांनी रविवारी (16 जुलै) ताब्यात घेतलेले होते.

शनिवारी (ता.15) रात्री साडेदहाच्या सुमारास सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या एकविरा चौकात आरोपी दुचाकी, चारचाकी वाहनांतून आले होते. त्यात भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेच्या चारचाकी वाहनाने अंकुश चत्तर यांना प्रथम उडवले असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आरोपींनीसह इतर आठ ते दहाआरोपींनी अंकुश चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, दांडकेच्या साह्याने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

यात अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले होते, हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दु:खापत झाली होती. अंकुश चत्तर यांना नगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा आज(17 जुलै) पहाटे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावेडीतील तोफखाना पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह इतर आठ ते दहा आरोपींवर खुनाचा प्रयत्नाबद्दल गुन्हा दाखल केला होता.

आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सूचना दिल्या होत्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. वैदवाडी), अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

शिंदे, कुऱ्हे, कांबळे, बुलाखे यांच्या विरोधात पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी शनिवारी चौघांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात जवळपास 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्वप्नील शिंदे हा प्रभाग चार मधील भाजपचा नगरसेवक आहे. त्याच्यावर यापूर्वीही तक्रारी दाखल आहेत. देवाज् ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून तो परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. महानगरपालिकेत भाजपचा गटनेता म्हणूनही त्याने काम पाहिले आहे. भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्याचे जवळकीचे संबंध आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT