Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंना मोठा धक्का; बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; कार्यकर्त्यांचा BRS मध्ये प्रवेश

Beed NCP Activists Joins BRS : धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय बाळासाहेब मस्के यांच्यासह मयुरी खेडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Munde sarkarnama

Beed NCP News: आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. कुठल्या गटात जावे, अशा संभ्रमात असताना मराठवाड्यात काही कार्यकर्त्यांनी थेट भारत राष्ट्र समिती पक्षात (BRS) प्रवेश केला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.

परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा भव्य सत्कारही परळीमध्ये करण्यात आला. या सत्काराला चोवीस तास उलटत नाही तोच त्यांच्या निकवर्तीयांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकडो कार्यकर्त्यांनी बीआरमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातो.

Dhananjay Munde
Nilesh Lanke : 'दादा' सोबत गेलेल्या आमदाराच्या मनात 'साहेब' च ; निलेश लंकेंकडून विद्यार्थ्यांना 'सिल्वर ओक' पुस्तक भेट..

बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांच्यासह राज्यातील प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत बीडच्या गेवराई येथे हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय बाळासाहेब मस्के यांच्यासह मयुरी खेडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काही दिवसापासून धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने भारत राष्ट्र समितीमध्ये करीत आहेत.

Dhananjay Munde
Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

दोन जुलै रोजी महाराष्ट्रात झालेल्या शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीवर मराठवाड्यात अनेक नेते नाराज असल्याचे दिसते. "राज्यातील अभद्र युती आणि आघाडीला कंटाळून शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी भारत राष्ट्र समितीमधे प्रवेश करीत असल्याचे या नेत्यांनी पत्रकारांना सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com