Balasaheb Thorat On Radhakrushna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : स्वतःचा कारखाना व्यवस्थित न चालवणारे 'गणेश' कसा चालवणार?; थोरातांचा विखेंना चिमटा !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुख :

Ahmednaga News : गणेश साखर चालवताना तुमचा हेतू साफ नाही. 3000 हजार टनाचे बोलता मग कारखान्याचे जिंदगी बाबत काय, कारखान्याच्या चेअरमनवर, सभासदांवर प्रचंड दहशत आहे, मात्र यातून कारखान्याची अवस्था काय करून ठेवलीय. ज्यांना स्वतःचा कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही, ते गणेश काय चालवणार? असा सवाल करत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

नगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीच्यानिमित्ताने सध्या राहाता-कोपरगाव परिसरात प्रचार सभांची रणधुमाळी सुरू आहे. राहात्यात थोरात-कोल्हे यांच्या श्री गणेश परिवर्तन मंडळ पॅनलच्या प्रचार सभेच्या निमित्ताने बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, मा.आ.सुधीर तांबे, एकनाथ गोंदकर, नारायण कार्ले, करण ससाणे, प्रभाताई घोगरे, सचिन गुजर, रामचंद्र बोठे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना ज्यांना स्वतःचा कारखाना चांगला चालवता आला नाही, ते गणेशचा काय विकास करणा? असा सवाल केला. आता आम्ही,कोल्हे एकत्र येत गणेश परिसरातील सभासद शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीत उतरलो आहोत. फक्त राजकारण नव्हे तर परिसरात असलेली हुकूमशाही हटवून दहशतीचे झाकणं मोकळे करण्यासाठी आणि गणेशला वैभव तर शेतकऱ्यांची उन्नती साठी निवडणुकीत लक्ष देत आहोत. त्यामुळे सभासदांनीही स्वतःच्या अस्मितेची निवडणूक समजून छत्री चिन्हावरील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यावे. भविष्यकाळ आपला असून संगमनेर-संजीवनी प्रमाणे कायापालट तुमच्या मतात आहे. विजयीसभा ही राहत्याच्या धुमधडाक्यात होणार असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणात, ही निवडणूक सभासदांच्या प्रपंचांची निवडणूक असून सभासदांनी आता वैयक्तिक हेवेदावे, दहशत झुगारून परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन केले. कोल्हे कुटुंब कोपरगाव मधील आमच्या विविध संस्थांत व्यस्त आहोत. पण गणेशची अवस्था, माझ्या आजोबांनी केलेले काम आणि सभासदांचा भावनिक आग्रह पाहून निवडणुकीत लक्ष घातले आहे, ते विजय मिळवण्यासाठी असे कोल्हे म्हणाले.

त्यांचे(विखेंचे) म्हणणे आहे की तुमच्याही संस्था आहेत, त्यावर माझाही त्यांना निरोप आहे की, हा शंकरराव कोल्हेंचा हा पठय्या त्यांचाच नातू आहे, असे जाहीर आव्हान विवेक कोल्हे यांनी एकप्रकारे विखेंना दिले.

पाहुणे म्हणू नका, अगोदरच त्यांनी मला पाहुणे केलेय!!

भाषणाची सुरुवात करताना एका वक्त्याने प्रथेप्रमाणे मुख्य अथितींचा उल्लेख करताना, बाळासाहेब थोरातांचे कौतुक करतानाच'आज उपस्थित असलेले पाहुणे बाळासाहेब थोरात' असा उल्लेख केला. यावर लागलीच थोरात यांनी, अहो मला पाहुणा म्हणू नका, आगोदरच त्यांनी(विखे) मला परका या अर्थाने पाहुणा केले आहे. पण मी येथील मतदार आहे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

एका प्रचारसभेत राधाकृष्ण विखे यांनी इतर तालुक्यातील काही पाहुणे आपल्याकडे आल्याचे सांगत आपल्यालाही त्यांच्याकडे आता जावे लागेल, असे म्हणत थोरात यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. याचाच धागा पकडत थोरातांनी ही कोटी केली आणि उपस्थितां मधे हशा उडाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT