Buldhana Farmers Agitation: रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर बुलढाणा पोलिसांनी बजावली नोटीस... ; काय आहे प्रकरण?

Farmars agitation तुपकरांंच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणानाही अलर्ट मोडवर आल्या आहेत.
Ravikant Tupkar :
Ravikant Tupkar :Sarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tupkar Aggressive against State Government : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तुपकर यांनी मुंबईतील पिकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

तुपकरांंच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणानाही अलर्ट मोडवर आल्या आहेत. बुलडाणा शहर पोलिसांनी (Police) तुपकरांना प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस दिली असून असे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. पण आता माघार नाही, जीव गेला तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, अशी भूमिका तुपकरांनी (Ravikant Tupkar) घेतली आहे.

Ravikant Tupkar :
Supriya Sule On Ajit Pawar: सुप्रियाताई म्हणतात, "अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,"

गेल्या काही महिन्यांपासून तुपकर, सोयाबीन - कापसाला दरवाढ द्यावी, पीकविमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मदतनिधी त्यांच्या खात्यात जमा करावा, पेरणीपूर्वी पीककर्जाचे वाटप करावे, पेरणी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने त्यांनी आता थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. (Vidarbha Farmers News)

राज्य सरकारने १५ जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत (Mumbai) येऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटच्या २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून खाली उड्या मारुन आत्महत्या करु, असा गंभीर इशाराच तुपकरांनी दिला आहे. तुपकरांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावत आंदोलन करण्यास मनाई केली आहे. सरकारला आमचे मृतदेहचं पहायचे असतील तर, आम्ही आनंदाने २० व्या मजल्यावरुन उड्या मारायला तयार असल्याची भूमिकाही तुपकरांनी घेतली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com