Bribe News
Bribe News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : एक लाखाची लाच अन् दोघे एसीबीच्या जाळ्यात : पोलिसांनी घेतलं ताब्यात!

सरकारनामा ब्यूरो

Bribe News : अहमदनगर (Ahmednagar News) येथील सोनई गावातल्या एका पतसंस्थेच्या लेखापरीक्षणात अध्यक्ष व नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना, नगर येथील विशेष लेखापरीक्षक व जळके खुर्द या गावातील एका खाजगी लेखापरीक्षकास लाच प्रतिबंधक पथकाने (ACB) रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.

पतसंस्थेच्या अध्यक्षास लेखापरीक्षण चांगले करुन त्यात मुदत ठेवीची रक्कम व्यवस्थित घेण्यासाठी तीन लाख रूपये मागितले होते. तडजोड करुन दोन लाख रूपये देण्याचे ठरले होते. लाच प्रतिबंधकचे पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर व पथकातील रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख व दशरथ लाड यांनी पंचासह थांबून तक्रारदार कडून एक लाखाची लाच घेताना नगर कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिगंबर सागर व जळके खुर्द येथील खाजगी लेखा परीक्षक तय्यब वजीर पठाण या दोघास ताब्यात घेवून नेवासे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. १७ मार्च २०२३ रोजी लाच मागण्यात आली होती तर आज सोमवारी नेवासे फाटा येथील एका ज्युस सेंटर मध्ये लाच घेताना आरोपीस ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT