Maharashtra Power Struggle : गेल्या नऊ महिन्यांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तांघर्षावरची सुनावणी अखेर संपली. याचा निकाल आता राखून ठेवण्यात आला आहे. मार्च महिना किंवा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला हा याचा निकाल लागण्याची शक्यता अनेक घटनातज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. न्यायालयात दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. यामुळे हा निकाल नेमका कसा असेल, तो कोणाच्य बाजूने असेल, याबाबत आताच अंदाज लावणे अवघड आहे. मात्र यावर शिंदे गटाच्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मोठे विधान केले आहे. न्यायपालिकेचा काहीही निर्णय आला तरी, त्याचा आम्ही सन्मान करू, त्यांच्यासारखं (शिवसेना ठाकरे गट) आम्ही न्यायालय विकलं गेलंय,असं आम्ही कधीही म्हणणार नाही, असे वक्तव्य खासदार जाधव यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार जाधव म्हणाले, “एक न्यायप्रक्रिया असते. आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. आम्ही न्यायालयात आमच्या परिने अनेक पुरावे आणि कागदपत्रे सादर केली आहेत. आमच्या बाजूचे वकील हरिश साळवे, नीरज कौल यांच्यासोबतच आमच्या इतर सर्व वकीलांनी आमची बाजू सशक्तपणे न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे."
"शेवटी ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. न्यायपालिकेची आपली एक न्यायप्रक्रिया असते. शेवटी न्यायालयाचा निकाल कसाही लागला तरी, त्यांच्यासारखं (शिवसेना ठाकरे गट) न्यायालय विकलं गेलंय वेगैरे आम्ही म्हणणार नाही. निकाल कोणत्याही बाजूने आला तरी आम्ही, न्यायालयाचा निर्णयाचा सन्मानच करू, " असेही खासदार जाधव म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.