Kiran Kale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर खड्ड्यांत पण आमदार जगतापांच्या सोयीच्या रस्त्यासाठी साडेचार कोटी! : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महापालिका आयुक्तांनी सुस्थितील रस्त्यावर साडेचार कोटी खर्च करण्याचा घाट घातल्याची तक्रार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने आज महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्याविरोधात आंदोलन केले. तेच महापालिका आयुक्त पुन्हा वादात सापडले आहे. आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या सोयीसाठी महापालिका आयुक्तांनी सुस्थितील रस्त्यावर साडेचार कोटी खर्च करण्याचा घाट घातल्याची तक्रार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे. ( Ahmednagar pits but for MLA Jagtap's convenient road four and a half crore! : Complaint to CM )

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे महापालिका आयुक्तांची तक्रार करत जनतेचे सुमारे 4 कोटी 39 लाख रुपये खड्ड्यात घालण्याचा महापालिकेचा डाव असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत काळे यांना ई-मेलद्वारे उत्तर पाठविला असून काळे यांनी केलेला तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास - 2 या विभागाकडे तात्काळ पाठविला असल्याचे कळविले आहे.

अहमदनगर महापालिकेने पुणे एसटी बस स्थानक ते आनंदऋषी समाधीस्थळापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे व दोन्ही बाजूने आरसीसी गटर करणे यासाठी सुमारे 4 कोटी 39 लाख रुपयांची निविदा नुकतीच काढली आहे. हा रस्ता सुस्थितीत असून देखील या रस्त्याच्या कामासाठी जनतेच्या पैशाची लूट करण्याच्या हेतूने निविदा काढली गेली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रादेशिक पर्यटन विकास निधी 2021-22 अंतर्गत आलेल्या निधीतील सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग गैरप्रकारे सुरू असल्याची तक्रार काँग्रेसने केली होती.

दिवसाढवळ्या जनतेच्या पैशांवर दरोडा घालण्याचे काम महापालिका यंत्रणेकडून सुरू आहे. व्यापारी, नगरकर नागरिक बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हवालदिल आहेत. बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी जाण्याची गरज शहराच्या आमदारांना वाटली नाही. मात्र आमदारांना त्यांच्या घरापासून कार्यालयाकडे दररोज ये-जा करताना काही अडचणी येऊ नयेत यासाठी या कामाचा घाट घातला आहे. अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक मात्र खड्डे असलेल्या रस्त्यांतून जीव मुठीत धरून मार्ग काढत जात आहे. नियोजित रस्ता काय आमदारांना विमानाच्या धावपट्टी सारखा चकचकीत करायचा आहे का?

- किरण काळे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT