Ahmednagar Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : शिर्डीत पार पडणार शरद पवार गटाचे राज्यव्यापी शिबिर; रणनीती काय?

Sharad Pawar Meeting in Shirdi : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर जिल्हा पातळीवर पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातील मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट काहीसा कमकुवत असल्याचे दिसून येत होते. मोठ्या संख्येने आमदार अजितदादांसोबत गेले. मात्र, शरद पवार यांनीही नाउमेद न होता राज्यभर ठिकठिकाणी दौरे करत सभांचा सपाटा लावला आहे. (Latest Marathi News)

जनतेतून शरद पवार यांच्या सभांना मोठा प्रतिसाददेखील मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर पुढील ऑक्टोबर महिन्यात शिर्डी येथे आयोजित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नगर येथील पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना फाळके यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर जिल्हा पातळीवर पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीतील 90 पैकी 60 सदस्य उपस्थित होते. गैरहजर कार्यकारिणी सदस्य-पदाधिकाऱ्यांबद्दल फाळके यांनी काही सदस्य अनुपस्थित होते. त्यांच्या जागी आम्ही नव्याने नियुक्ती करणार असल्याचे स्पष्ट केले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. त्यापैकी प्राजक्ता तनपुरे, रोहित पवार हे दोन आमदार पक्ष फुटीनंतर शरद पवार गटासोबत राहिले, तर नीलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे हे चार आमदार अजित पवार गटासोबत गेले आहेत.

(Edited News : Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT