NCP Politics in Kolhapur : ...तर जिल्हा बँकेत काय झाले ते सगळं बाहेर काढू : मुश्रीफांना इशारा कुणाचा ?

Hasan Mushrif News: अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरील संघर्षही दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

Kolhapur Politics : "शरद पवारांचा पक्ष म्हणजे निष्ठावंतांची राष्ट्रवादी आहे. या गटाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा ईड़ी चौकशीत किंवा जिल्हा बँक चौकशीत नेमके काय घड़ले? याची यादी बाहेर काढू," असा इशारा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता दिला आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरील संघर्षही दिवसेंदिवस वाढू लागला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उभे राहिले असून, त्यांनी राज्यभरात जनमेळावे सुरू केले आहेत.

Hasan Mushrif
NCP Ajit Pawar Group Vs Padalkar : आमदार पडळकरांच्या पवार कुटुंबावरील खोचक टीकेनंतर अजित पवार गट संतापला, दिला 'हा' इशारा

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या हसन मुश्रीफांच्या कागल विधानसभा मतदारसंघात नुकताच राष्ट्रवादीचा जनमेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी मुश्रीफ यांना थेट इशारा देत त्यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

पाटील म्हणाले, '२०२४ च्या निवडणुकीत कागलमधून राष्ट्रवादी गटाचा उमेदवार आम्ही देणार आहोत. गटांतर्गत चुगली करून आपण आपली 35 वर्षे राजकीय पोळी भाजून घेतली. चुकीची कामे केल्यानेच तुम्हाला भाजपसोबत जावे लागले. सामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःची प्रगती साधली; पण आता जिल्ह्यात किंवा तालुक्यात आडवे याल तर याद राखा, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

तर शरद पवारांनी तुम्हाला राजकीय ताकद दिली, पण तुम्ही त्याचा वापर अवैध संपत्ती गोळा करण्यासाठी केला. मात्र, हे सर्व बाहेर पडू नये म्हणून तुम्ही भाजपकडे गेलात, असा आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला. ते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

Edited By- Anuradha Dhawade

Hasan Mushrif
Nagar Politics : गतिमान कसले, हे तर गतिमंद सरकार : प्राजक्त तनपुरेंनी तोफ डागली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com