Asaduddin Owaisi narendra modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : 'दिल्लीत जादूगार बसलेत...' म्हणत ओवेसींनी सांगितला भारत विश्व गुरु कधी होणार?

AIMIM chief Asaduddin Owaisi slams PM Narendra Modi : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीदीन ओवेसी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sudesh Mitkar

  1. AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून हल्ला केला.

  2. ओवेसींनी मोदींना "केंद्रात बसलेला जादूगार" असे संबोधले.

  3. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

Pune News : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीदीन ओवेसी यांची आज पुण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. तसेच मोदी हे केंद्रात बसलेले जादूगार आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली.

असुद्दीदीन ओवेसी म्हणाले, भाजपचे जे काही खासदार निवडून आले आहेत. ते मोदींच्या नावाने आले आहेत. हे सगळं करणारा एक जादुगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे अशी टीका असुद्दीदीन ओवेसी यांनी मोदीवर केली.

सध्याच्या केंद्रातील पंतप्रधानांच्या धोरणामुळे आपली लोकसंख्या जसजशी वृद्धत्वाकडे जाईल त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यांच्या धोरणामुळे दोन पिढ्या बरबाद होणार आहेत. नवीन जनरेशनमधील 25 टक्के युथला व्यवस्थित शिक्षण आणि नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यात पेपर लीक सारखींप्रकरण, भ्रष्टाचार वाढला आहे. श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत व गरीब गरीब. सर्वसामान्यांना पाच पाच वर्ष बेल मिळत नाही. आणि दुसरीकडे बलात्कार करणाऱ्यांना लगेच बेल मिळते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.

काही पक्षांकडून तरुणांना मुस्लिमांविरुद्ध पेटवलं जात आहे. मुस्लिमांच्या मागे गोरक्ष लावले जाते आहे. या सगळ्या गोष्टी आत्ता लक्षात येत नसल्या तरी सांगितलं पुढे जाऊन या पिढीला त्यांच्या चुका लक्षात येतील, पण वेळ निघून गेलेली असेल. सध्या मुस्लिम समाज सर्व क्षेत्रात मागे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते सामजिक मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना समानता द्या. परंतु भाजप व अन्य कोणीही याकडे लक्ष देत नाही. परंतु लोकशाहीतील बदल व राष्ट्रीय सुरक्षितेबद्दल भाजपकडे कोणताच पर्याय नाही. यासाठी विरोधी पक्ष देखील ताकदवर हवे आहे.

सक्षम विरोधी पक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक निवडणुका लढतोय. हारजित होतच असते. पण लोक आम्हाला मतदान करत आहेत. यातून दिसून येत आहे की लोकांना पर्याय हवा आहे. आम्ही अनेक पक्षांशी वेळोवेळी युती केलीय. आता आम्ही सामाजिक मागास लोक एकत्र यावेत, या प्रयत्नात आहोत. त्याला एका स्टेजवर आल्याशिवाय पर्याय नाही.

काही लोक दर्ग्यावर चादर चढवणे, शिरखुरमा पिऊन आम्ही सगळे एक आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा काही उपयोग नाही. हा फक्त दिखाऊ पणा आहे. मुस्लिमांना देखील भारतीय म्हणून वागणूक मिळाल्याशिवाय इंडिया एकच आहे ही भावना निर्माण होणार नाही. तोपर्यंत भारत विश्व गुरु म्हणून पुढे येणार नाही जर सर्व भारतीय एक म्हणून पुढे आले तर भारत विश्वगुरु म्हणून पुढे येईल असेही ओवेसी म्हणाले.

FAQs :

प्र.१: असदुद्दीन ओवेसी यांनी कुठे टीका केली?
उ: त्यांनी पत्रकार परिषदेतून नरेंद्र मोदींवर टीका केली.

प्र.२: ओवेसींनी मोदींना काय म्हटले?
उ: त्यांनी मोदींना "केंद्रात बसलेला जादूगार" असे म्हटले.

प्र.३: या वक्तव्यामुळे काय परिणाम झाला?
उ: या वक्तव्यामुळे राजकीय वादंग उफाळला आहे.

प्र.४: AIMIM प्रमुख ओवेसी यांचा टीकेचा विषय काय होता?
उ: केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली.

प्र.५: या वक्तव्यावर इतर पक्षांनी प्रतिक्रिया दिली का?
उ: हो, या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे, विविध पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT