Pandharpur, 18 July : मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि सध्या जरांगेंच्या विरोधात उभे ठाकलेले अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळून खाक झाली आहे. बारस्कर महाराजांची ही गाडी जाळण्यात आली की गाडीला आग लागली, याची तपास पोलिस करत आहेत.
आषाढी एकादशीला बुधवारी (ता. 17 जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे, ती आज उघडकीस आली आहे. अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांची टोयटो गाडी होती. या घटनेमुळे पंढरपूरमध्ये (Pandharpur) एकच खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात अजय महाराज बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करत होते. त्या दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. मनोज जरांगे पाटील यांनी बारस्कर महाराजांवर कठोर शब्दांत टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात बारस्कर महाराज यांची गाडी जळाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी अजय बारस्कर हे आपल्या चारचाकी गाडीतून (एमएच 12-BP-2001) विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आले होते. बारस्कर हे मंगळवारी दुपारी (16 जुलै) पंढरपूरमध्ये आले होते. त्यांनी 65 एकर परिसरात नगरपालिकेच्या वाहनतळावर आपली टोयाटो कंपनीची चार चाकी गाडी लावली होती.
विठ्ठलाच्या दर्शनानंतर अजय बारस्कर हे बुधवारी (ता.17) दुपारी गाडी घेण्यासाठी वाहतनळावर गेले. त्या वेळी त्यांना आपली गाडी जळून खाक झाल्याचे दिसून आले. या घटनेत बारस्कर महाराजांचे सुमारे दहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी अजय बारस्कर यांनी तक्रार दिली आहे. पंढरपूरचे पोलिस निरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.
बारस्करांची गाडी डॉ. दाते यांच्या नावावर
अजय महाराज बारस्कर यांनी टोयटो गाडी 2022 मध्ये पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मनोज मानाभाऊ इंगळे यांच्याकडून खरेदी केली होती. मात्र, पंढपूरमध्ये जळालेल्या टोयटो गाडीची सर्व कागदपत्रे ही डाॅ. जयदीप दाते यांच्या नावार आहेत, अशी माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.