Pandharpur Assembly : माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांना धोबीपछाड देत पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रणिती शिंदेंची मुसंडी

Lok Sabha Election 2024 : महायुतीकडे तालेवर नेते असूनही प्रणिती शिंदेंनी मारलेली मुसंडी आमदार भाजप आमदार, नेतेमंडळींना विचार करायला लावणारी आहे.
Mahayuti Leader_Praniti shinde
Mahayuti Leader_Praniti shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोहोळनंतर सर्वाधिक ४५ हजारांचे मताधिक्क्य पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाने दिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे एक आमदार, एक माजी मंत्री, एक माजी आमदार आणि साखर कारखान्यांचे तीन चेअरमन, तसेच कार्यकर्त्यांचा मोठा संच असूनही प्रणिती शिंदेंनी मताधिक्क्य घेतले. महायुतीकडे तालेवर नेते असूनही प्रणिती शिंदेंनी मारलेली मुसंडी आमदार भाजप आमदार, नेतेमंडळींना विचार करायला लावणारी आहे.

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना सोलापूर लोकसभा मतदासंघातून ६ लख २० हजार २२५, तर राम सातपुते यांना ५ लाख ४६ हजार ०२८ मते मिळाली आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्यात (Pandharpur-Mangalvedha) प्रणिती यांना १ लाख २४ हजार ७११ मते, तर सातपुते यांना ७९ हजार २९१ मते मिळाली आहेत. म्हणजेच या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार ४२० मतांचे अधिक्य मिळाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंढरपूर-मंगळेवढ्यात महायुतीकडे भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील अशी नेत्यांची तगडी फौज होती. याशिवाय सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवकांची संख्या वेगळी आहे. मात्र, बलाढ्य शक्ती पाठीशी असूनही राम सातपुते यांना ही मातब्बर नेतेमंडळी लीड देऊ शकली नाहीत.

भारत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शक्ती पणाला लावून पंढरपूर- मंगळवेढ्याची जागा जिंकली होती. त्यावेळी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पैसे नाही दिले तर केंद्रातून निधी आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अजूनही फलशिश्चिती झालेली नाही.

Mahayuti Leader_Praniti shinde
MNS-NCP Bet : सोलापुरातील विजयाची मनसे पदाधिकारी हरला पैज; शरद पवार गटाला दिला लाखाचा धनादेश

तोच पाण्याचा मुद्दा मंगळेवढ्यात निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला होता. याशिवाय मराठा आरक्षण, कांदा प्रश्न, मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारक, असे काही महत्वाचे मुद्देही निवडणुकीत चर्चिली गेले. त्याचा परिणाम सातपुते यांना मिळणाऱ्या मतांवर झाला.

प्रणिती शिंदे यांच्या बाजूने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी एकट्याने किल्ला लढवला. त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत शिंदे यांच्यासाठी काम केले. प्रणिती शिंदे यांना पंढरपूर-मंगळवेढ्यातून मताधिक्क्य देण्यात भालके यशस्वी ठरले आहेत. आता खरी कसोटी भाजप नेत्यांची आहे.

Mahayuti Leader_Praniti shinde
NCP Sharadchandra Pawar Party : रामकृष्ण हरी म्हणत अपक्षांचीही वाजवली तुतारी; राष्ट्रवादीने सातारा गमावला, बीड कसाबसा वाचला

अवघ्या चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. विद्यमान आमदार समाधान आवताडे पुन्हा इच्छूक आहेत. प्रशांत परिचारक यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणूक मध्यावर आल्यानंतर भाजपसोबत आलेले अभिजित पाटील हेही विधानसभेसाठी इच्छूक आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना पंढरपूर मंगळवेढा विधानभा मतदारसंघातून तिकिटही जाहीर झाले होते. मात्र, विठ्ठल कारखान्यावरील कारवाईनंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारखान्यावरील मेळाव्यात जे तुमच्या मनात तेच मी करणार आहे, असे सांगून अभिजित पाटील यांनाही विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महायुतीची पंढरपूर- मंगळेवढ्याची विधासभेची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Mahayuti Leader_Praniti shinde
Prajakt Tanpure : लंकेंच्या विजयानंतरही तनपुरेंच्या पदरी अधिकचा गृहपाठ, धाकले विखे डावपेचाचे प्रहार करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com