Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : नाराजीच्या चर्चांवर अजित दादांनी थेट दिल्लीतील घटनाक्रमच सांगितला

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : माझ्या नाराजीच्या बातम्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. मला केंद्राच्या राजकारणात रस नाही, राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी माझ्यावर आहे, राज्याच्या राजकारणात मला रस आहे. आणि ते काम मी करत आहे. असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मला केंद्रातील राजकारणात रस नाही, राज्याच्या राजकारणात रस आहे. खासदार असताना मी राष्ट्रीय पातळीवरील कामकाज पाहिले पण त्यानंतर मी राज्याच्या राजकारणात सक्रिय झालो, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

१५ तारखेला काही लोक पक्षात प्रवेश करणार आहेत त्यासाठी धुळ्यात जाणार आहे. येत्या चारपाच दिवसात मी जळगाव, धुळे, अमळनेर नागपूर दौऱ्यावर जाणार आहे. राज्यभरात ठिकठिकाणी माझे विविध कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी मी आमची भूमिका मांडणार आहोत. राज्यात महागाई, बेरोजगारी, सारखे प्रश्न आहे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहेत. जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो. जनतेचे प्रश्न अन् शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. (NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्यानंतर शनिवारी बैठक होती. पण मी उशिरा पोहचलो म्हणून माझ्या नाराजीच्या बातम्या सुरु झाल्या. पण कालची बैठक राष्ट्रीय पातळीवरची पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्यातील पदाधिकारी आहे. त्यामुळे मी बैठकीला उशिरा पोहचलो. बैठकीनंतरही मी लवकर निघून गेलो म्हणूनही चर्चा व्हायला लागल्या. पण माझे पुण्याचे विमान दुपारी ४ वाजता होते. त्याच्या एक तास आधी विमानतळावर पोहचावे लागते. त्यामुळे मी लवकर निघून गेलो. असही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT