Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अरे तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर! गाडीतून उतरताच अजितदादा जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले...

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक घेतली.

Rajanand More

Kolhapur News : कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर भडकल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. एखादं काम दर्जेदार नसेल तर ते संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर जाब विचारतात. याचा अनुभव अनेक अधिकारी, ठेकेदारांनी घेतला आहे. गुरूवारी त्यांच्या टप्प्यात थेट कोल्हापूरचे जिल्हाधिकारीच आले.

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आपला राग काढला. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ते विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या मोटारींचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. यादरम्यान त्यांचे वाहन खराब झाले. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचण्यासाठी विलंब झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहचल्यानंतर अजितदादा गाडीतून खाली उतरले. त्यांच्या स्वागताला बरीच गर्दी जमली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना पाहून थोडा लेट झाला पालकमंत्री महोदय, असे अजितदादा म्हणाले. तिथे जिल्हाधिकारीही उपस्थित होते. त्यांच्याकडे कटाक्ष टाकत अजितदादांनी थेट मुद्दाला हात घातला.

अरे तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर, असे नाराजीच्या सुरात बोलत अजितदादांनी आपला त्रागा व्यक्त केला. त्यावर पाच गाड्यांची मागणी केलीय, ती पाठवलीय, असे उत्तर येडगे यांनी दिले. मी आत्ताच्या आता ऑर्डर देतो, कुणाकडं पाठवलंय तुम्ही, असा आदेशच अजितदादांनी काढला. त्यामुळे येडगे यांच्यासह प्रशासनातील इतरांची तारांबळ उडाली.

दरम्यान, मीडियाशी बोलताना अजित पवारांनी गाड्यांबाबत माहिती दिली. डीव्ही कार साठी मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं. 5 वाहने मागितली आहेत, असे सांगितले. कोल्हापुरातील विविध विकासकामांसंदर्भात आज बैठक घेतल्याचेही त्यांनी सांगितले. हद्दवाडी संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींचा देखील ऐकून घ्याव लागते. त्या बैठकीत बऱ्याचअंशी मार्ग निघेल, अशी चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT