Maharashtra Politics : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण हाके यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली आहे. हाके यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांकडून हाकेंवर टीका होत आहे. मुश्रीम यांनीही हाकेंच्या विधानावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा असतो, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले.
एका कुटुंबातले दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्याच्या मेळाव्याला सुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. राजकारणात काय बदल होतात. हे नंतर निवडणुकीत जनता ठरवेल. प्रसारमाध्यमातून चर्चा सुरू होतात, जसं ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सगळ्या पवारांनी एकत्र यावे, यासाठी शुभेच्छा सर्वांनी दिल्या आहेत. शरद पवार यांनी भाजप सोबत गेलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, असे यापूर्वी सांगितले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ रस्ता कोल्हापूरातून रद्द संदर्भातली अधिसूचना निवडणुकीपूर्वीच रद्द केली होती. कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गाबाबत भूमीसंपदानाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याबाबतच्या मुद्द्याला मी आणि आबिटकर यांनी विरोध केला होता. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आम्हाला मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही आमची भूमिका देखील मांडू. चंदगड मधून जर तो महामार्ग जायला शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तो देखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
नवीन दहा एमबीबीएस कॉलेजला केंद्राने परवानगी दिली आहे. ज्यामध्ये असलेल्या त्रुटीबाबत नोटीस आली होती. त्याला आम्ही उत्तर दिली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफ याबाबत काही मुद्दे होते मात्र जागा कमी करण्यासंदर्भात ज्यांनी कोणी माहिती दिली त्यांनी निदान पहिला अभ्यास करणे गरजेचे आहे. कुठलीही जागा कमी करण्यात आलेली नाही. ज्यांनी कोणी ही माहिती दिली त्यांनी जर माझी भेट घेतली तर त्यांच्या बुद्धीमध्ये मीच भर घालेल, असेही मुश्रीफ म्हणाले.
सीपीआर मधील मृतदेहाच्या हेळसांडीबद्दल मला माहिती मिळाली. मी आज यासंदर्भात बैठक घेत आहे. सीपीआरच्या अधिष्ठातांकडून याबाबत माहिती घेईल आणि संबंधित प्रकारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार पुन्हा होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.