Ramdas Athawale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला नको होते...

केंद्रीय मंत्री तथा आरपीआय (आठवले गट)चे नेते रामदास आठवले ( Ramdas Athawale ) आज अहमदनगर दौऱ्यावर आले होते.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - केंद्रीय मंत्री तथा आरपीआय (आठवले गट)चे नेते रामदास आठवले ( Ramdas Athawale ) आज अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी त्यांच्या खास काव्यपूर्ण शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व भाजपचे कौतुक करताना महाविकास आघाडीवर टीका केली. ( Ajit Pawar did not want to be given the post of Deputy Chief Minister ... )

रामदास आठवले म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी काही आमदार आवश्यक आहेत. पहाटेच्या शपथ विधीनंतर अजित पवार यांच्या सोबत काही आमदार आले असते तर आमचे सरकार बनले असते. अजित पवार शपथविधीला आले मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलविल्यानंतर पुन्हा निघून गेले. ते शरद पवारांना विचारून आले होते का? हे आम्हाला माहीत नाही मात्र ते शपथविधीला आले होते. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते पुन्हा इकडे आले असते. अजित पवारांना ते पद द्यायला नको होते. कारण त्यांनी पक्षाची प्रतारणा केली होती, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, शिवसेना आमच्या सोबत येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार पडत नाही हे आम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादी आमच्या सोबत येत नाही अथवा काँग्रेस पाठिंबा काढत नाही तोपर्यंत सरकार पडत नाही. सरकार पडेल अशी आमची भावना नाही. सरकार जर पडले तर ते आपल्या कर्मामुळे पडेल. सरकार पडले तर आम्ही तयारी करत आहोत.

नवाब मलिक माझे मित्र

राज्यातील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनामा भाजप मागत आहे यावर रामदास आठवलेंनी सांगितले की, नवाब मलिक आमचे चांगले मित्र आहेत. अनेक वर्षे त्यांच्या सोबत राहिलो होतो. ते मित्र असले तरी त्यांच्या जमीन खरेदीमध्ये गडबड आहे. नवाब मलिक यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत त्यांच्या चौकशीचा आणि केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे गंभीर आहेत. नवाब मलिक यांचे दाऊदचे असलेले संबंध ही गंभीर बाब आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेले संबंध आम्ही समजू शकतो, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

पाच राज्यात मिळालेवे यश हे आम्ही गेल्या आठ वर्षांपासून जनसामान्यांना दिलासा, भ्रष्टाचार मुक्त भारत आणि आठ वर्षात कोणत्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नसण्याचा परिपाक आहे. मुंबई महापालिकेसह राज्यात असलेल्या पंधरा महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आम्हाला चांगले यश मिळेल कारण लोकांच्या मनात भाजप व मित्रपक्षां विषयी चांगले मत आहे, असे त्यांनी सांगितले.

केजरीवाल नरेंद्र मोदींना देतील फाईट

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अरविंद केजरीवाल हे सक्षम विरोधक म्हणून चर्चे आहेत मात्र नरेंद्र मोदींच्या विरोधात केवळ केजरीवालच नाही तर शरद पवार, ममता बॅनर्जी आहेत. देशातली सर्व विरोधकांचा विरोध परतावून लावण्यासाठी मोदी आणि आम्ही सक्षम आहोत, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

राज्यपालांनी सांभाळून बोलावे

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांभाळून बोललं पाहिजे. काही साहित्यिकांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे लिखाण केला आहे. त्यामुळे ते बोलले असतील मात्र त्यांच्यामुळे शिवाजी महाराज शूर झाले असं म्हणता येणार नाही. शिवाजी महाराज स्वतः शूर होते. त्यामध्ये रामदास स्वामींचा काही संबंध येत नाही, असे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले.

कवितेतून टीका

काँग्रेस और अपोझिशन को हराने का बीजेपी का है नारा ।

हमारे पास है नरेंद्र मोदी जैसा चमकने वाला तारा ।।

हमने तो जगा दिया है भारत सारा ।

2024 में बजा देंगे हम काँग्रेस पावर पोजीशन के बारा ।।

अशी शिघ्र कविता करत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT