रामदास आठवले म्हणतात; शिवसेनेला मुंबईत हरवणे अवघड नाही...

भाजपला (BJP) मनसेची (MNS) आवश्यकता नसल्याचे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले आहे.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

पंढरपूर : मुंबई महानगर पालिका निवडणुकीत (BMC) भाजप-मनसे एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच, सोमवारी (ता.14 फेब्रुवारी) आरपीआयचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मात्र भाजपला (BJP) मनसेची (MNS) आवश्यकता नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Ramdas Athavale
मावळच्या बाळा भेगडेंनी सांगितले, भाजपसह डॅा. सावंतांच्या विजयाचे गणित..

रामदास आठवले सोमवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजप-मनसे युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. आठवले म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजप सोबत आरपीआय असल्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवणे आता फार अवघड नाही. भाजप-आरपीआय युतीला मुंबई महानगर पालिका निवडणुकीत 120 पेक्षा अधिक जागा मिळतील. त्यामुळे पालिकेवर आमचीच सत्ता येणार आहे. संजय राऊत हे भाजपवर सतत टिका करत आहेत. त्यांच्या टिकेचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यांच्या टिकेमुळे शिवसेनेवरच निगेटीव परिणाम होत आहे, असा टोला राऊत यांना लगावला आहे.

Ramdas Athavale
बिनविरोध नेत्यांच्या भूमिकेमुळे महाआघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली; भाजपने लावला जोर!

आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची इच्छा नाही. त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे ते आपोआप पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, महाविकास आघाडी सरकारने घतलेल्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर बोलतांना आठवले म्हणाले, या निर्णयाला आरपीआयचा विरोध आहे. सरकारने वाईन विक्रीचे धोरण मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला. याबरोबरच हिजाबबद्दल बोलतांना शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी धर्म, जात आणू नये, शाळांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे, असे स्पष्ट मत आठवलेंनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com