Ajit Pawar-Gopichand Padalkar
Ajit Pawar-Gopichand Padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर अजित पवारांनी दिले हे उत्तर!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘जिल्हा, शहरांची नावे बदलण्याच्या मागण्या आज होत आहेत का. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणांहून तशा मागण्या आहेत. प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. हा प्रश्नही महत्वाचा आहेच. पण, त्याचबरोबरच इतरही प्रश्न महत्वाचे आहेत. त्याही गोष्टीला महत्व देण्याची गरज आहे. यातून आपण काय मिळवणार आहोत आणि काय संदेश देणार आहोत, हे ज्याने त्याने समजून घेतले पाहिजे,’’ अशा शब्दांत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या मागणीला अजित पवारांनी (Ajit Pawar) उत्तर दिले. (Ajit Pawar Gave This answer on the demand of Gopichand Padalkar)

नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्याबाबत विचारण्या आलेल्या प्रश्नावर पवार यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की राज्यातील अनेक ठिकाणांहून नावे बदलण्याची मागणी होत आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद शहाराचे नामकरण करण्याची मागणी होत आहे. प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबरच इतरही प्रश्न महत्वाचे आहेत. यातून आपण काय मिळवणार आहोत आणि काय संदेश देणार आहोत, हेही समजून घेतले पाहिजे.

शिवसेनेला दिलेला शब्द पाळणार

राज्यसभेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप दोन, राष्ट्रवादी दोन, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एक या प्रमाणे सहाजण निवडून गेले होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शिवसेनेला सांगितले होते की, उमेदवार निवडून येण्यासाठीची आवश्यक मते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत, त्यामुळे या वेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मते देतो, त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकची जी मते आहेत, ती आम्ही यंदा शिवसेनेला देणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

देशमुख, मलिकांना मतदानाला आणणार

अजित पवार यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लगाली आहे. न्यायालयात दाद मागण्याची तयारी करण्यात आली आहे. मागच्या काळातही अशा काही घटना घडलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पूर्वी विधीमंडळात मतदानासाठी आले होते, त्यामुळे मलिक आणि देशमुखांच्या मतदानासाठी आम्ही मोठ्या कसोशीने कामाला लागलो आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT