राज्यसभा निवडणुकीबाबत अजितदादांचं सूचक विधान : 'अर्ज सहा की सात, यावर चर्चा सुरू आहे!'

राज्यसभा निवडणुकीबाबतचे अंतिम चित्र माघारीनंतर तीन तारखेला तीन वाजता स्पष्ट होणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीबाबत (Rajya Sabha Election) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीचे अंतिम चित्र तीन जून रोजी माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत सात अर्ज राहणार की सहाच अर्ज राहणार, याबाबत सध्या वेगवेगळी चर्चा सुरू आहे, असे विधान पवार यांनी केले आहे. (Ajit Pawar's suggestive statement regarding Rajya Sabha elections)

मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी वरील विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री पवार यांना ‘काँग्रेस उमेदवाराबाबत नाराजी आहे. सहाव्या उमेदवारामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक असे पाच उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या मतांच्या आधारे सहज निवडणू येऊ शकतात. कारण, आम्हा सर्वांना पक्ष प्रतोदला दाखवूनच मतदान करावं लागतं.

Ajit Pawar
विधान परिषद निवडणूक : महाआघाडीला भाजप झुंजवणार; पाचवा उमेदवार रिंगणात उतरवणार?

सहाव्या उमेदवारांसंदर्भात शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार दिला आहे. राज्यसभा निवडणुकीबाबतचे अंतिम चित्र माघारीनंतर तीन तारखेला तीन वाजता स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत सात अर्ज राहणार की सहाच अर्ज राहणार आहे. वेगवेगळी चर्चा त्यासंदर्भात सुरू आहे, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.

Ajit Pawar
भगिरथ भालकेंच्या बैठकीत राडा : ऊसबिल मागणाऱ्या शेतकऱ्याला समर्थकांकडून मारहाण

दरम्यान, भाजपनं २० जूनला मतदान होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. चार उमेदवार निवडणून येण्याएवढे संख्याबळ असलेल्या भाजपने पाचवा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विशषतः शिवसेनेने उमेदवार मागे घेतला तर मग चार उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्या कोण माघार घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
तब्बल १५ वर्षानंतर ‘यूपीएससी‘त फडकला पिंपरी-चिंचवडचा झेंडा

जे राजकीय पक्ष आहे, त्यांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या पोलिंग एजंटाला मतदान केल्याचे दाखवावे लागणार आहे. अपक्ष आमदारांना मत दाखवता येत नाही. गुजरातमध्ये तसं घडलं, तेव्हा ते मतं मोजलं गेलं नव्हतं. आता १०-१२ मतं शिवसेना आणि भाजपला लागतात. अपक्षांमधील काहीजण शिवसेनेशी संबंधित आहेत, तर काही राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि भाजपशी संबंधित आहेत.

Ajit Pawar
भाजपच्या दक्षिण विस्ताराच्या स्वप्नाला मित्रपक्षानंच लावला सुरुंग!

सातारा जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीबाबतही शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार म्हणाले की, प्रत्येकाची नाराजी असू शकते. पण, बाहेर वक्तव्य करण्यापेक्षा आघाडीने नेमलेल्या समितीकडे याबाबतची तक्रार करायची असते. तीन पक्ष एकत्र आल्यावर भांड्याला भांड लागणारच. ते लागू नये, यासाठी तीनही पक्षाच्या सर्व नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर राज्याचा आरोग्य विभाग, राज्य सरकार आणि टार्स्क फोर्स, वैद्यकीय शिक्षण विभाग त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच, मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com