Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांच्या भडकलेलेल्या आंदोलनामागे नेमके कोण? अजित पवारांना भलतीच शंका; म्हणाले,...

Political News : कोल्हापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात गेल्या काही दिवसापासून Mpsc च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या भडकलेलेल्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. Mpsc च्या विद्यार्थ्यांना विरोधी पक्षाचे आमदार भडकवत होते, असा आरोप त्यांनी केला. पण आता परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुका जवळ येत आहेत, तसे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. आमच्या सरकारने काही योजना दिल्यानेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. राज्य सरकारला कुठे कात्रीत पकडता येईल, त्या संधीचे वाट विरोधक पाहत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar News)

कोल्हापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासह महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरकराच पावसाळ्यातील दुखणं कायमच आहे. हे संकट टाळण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला वळवणार. लाडकी बहीण योजनेबद्दल हवशे-नवशे बोलत आहेत. पैसे काढून घेतील असा खोटा प्रचार काहीजण करत आहेत. एकपण माय का लाल पैसे काढून घेणार नाही. ही योजना पुढेपर्यंत घेऊन जाणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

50 हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. त्याबाबत तरतूद केली आहे, लवकरच ते पैसे मिळतील. त्या पैशाबदल शेतकरी वर्गांनी कसलीच चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

सरकारच्या बदनामीचा प्रयत्न

समाजात काही वेगळ्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाटेल ते खर्च करत आहे. गावावरून ओवाळून टाकलेले काही नालायक वाईट कृत्य करतात. पण त्यातून सरकारची बदनामी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT