Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

Beed Assembly Constituency : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.
MLA of Beed District
MLA of Beed DistrictSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर या ठिकाणी भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यासोबतच गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य या जिल्ह्यावर राहिले आहे.

बीड जिल्हा हा दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने दोन उपमुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री दिले आहेत. यामध्ये दिवंगत माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके तर आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसापासून येथील राजकीय समीकरण बदलली आहेत. बीड हा राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा अशी ओळख आहे. विशेषतः या ठिकाणी आतापर्यत झालेल्या भाऊबंदकीतील लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) फूट पडल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचा परिणाम बीड जिल्ह्यातील राजकारणावर झाला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पैकी तीन आमदार अजित पावर गटासोबत आहेत.

बीड जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली तर ओबीसी समाजाचे प्राबल्य आहे. जवळपास 40 टक्के ओबीसी मतदार आहेत. त्यामध्ये वंजारी, धनगर, माळी व तेली समाज मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो. त्यासोबतच मराठा समाज 25 टक्के तर मुस्लिम समाज 10 टक्के व दलित समज 10 टक्के तर इतर समाज 5 टक्के आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून बजरंग सोनवणे उभे होते. महायुतीकडील आमदारांची संख्या पाहता पंकजा मुंडे यांचं पारडं वरचढ वाटत होतं.

मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि बजरंग सोनवणे खासदार म्हणून लोकसभेत गेले. पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. बजरंग सोनवणे यांना गेवराई, बीड आणि केज मतदारसंघातून आघाडी मिळाली.

केज आणि गेवराई या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभा होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे .

MLA of Beed District
Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

बीड जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

2019 च्या निवडणुकीत भाजपनं दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार आता महायुतीकडे पाच आमदार आहेत. यामध्ये भाजपकडे केज आणि गेवराई हे दोन मतदारसंघ आहेत, तर अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे परळी, आष्टी व माजलगाव येथील तीन आमदारांचा समावेश आहे. तर मविआकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे बीडमधील एक आमदार आहेत.

बीड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार

बीड विधानसभा - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)

गेवराई विधानसभा - लक्ष्मण पवार (भाजप)

माजलगाव विधानसभा - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)

आष्टी विधानसभा - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)

केज विधानसभा - नमिता मुंदडा (भाजप)

परळी विधानसभा - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)

MLA of Beed District
Hingoli Assembly Election : हिंगोली विधानसभा निवडणुकीत काय होणार? उत्सुकता शिगेला...

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

बीड विधानसभा मतदारसंघ :

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून शिवसेनकडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर मैदानात उतरले होते.

यामध्ये संदीप क्षीरसागर यांना 99 हजार 934 मते मिळाली तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 750 मते मिळाली होती. पुतण्याने 2200 मताने काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता.

त्यापूर्वी 2014 व 2019 मध्ये जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून पुन्हा संदीप क्षीरसागर मैदानात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावरून याठिकाणचे गणित अवलंबून असणार आहे. शिवसेना शिंदे गटाला सुटल्यास सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप इच्छुक आहेत.

गेवराई विधानसभा मतदारसंघ -

या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता. पवार यांना 99 हजार 625 मते मिळाली होती तर पंडित यांना 92 हजार 833 मते मिळाली.

यामध्ये सहा हजार 792 मताने पवार विजयी झाले होते. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार हे इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जागा कोणाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

MLA of Beed District
Parbhani Assembly Election: विधानसभेला परभणी जिल्ह्यावर कोण वर्चस्व गाजवणार?

माजलगाव विधानसभा मतदारसंघ -

माजलगाव मतदारसंघातून 2019 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंखे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांना धूळ चारली होती. सोळंके यांना 1 लाख 11 हजार 566 मते मिळाली तर आडसकर यांना 98 हजार 676 मते मिळाली होती.

येत्या काळात होत असलेल्या निवडणूक रिंगणातून आमदार प्रकाश सोळंके यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या जागी ते पुतणे जयसिंग सोळंके निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जागा सुटणार हे ठरले नसल्याने अद्याप उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे उत्सुकता असणार आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघ -

या मतदारसंघातून 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता. बाळासाहेब आजबे यांना 1, 26, 756 मते मिळाली तर भाजपचे धोंडे यांना 1 लाख 931 मते मिळाली.

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत तर महाविकास आघाडीकडून जागा कॊणाला सुटणार यानंतर उमेदवार ठरणार आहे.

MLA of Beed District
Bjp News : भाजपच्या शिष्टमंडळाकडून समरजितसिंह घाटगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

केज विधानसभा मतदारसंघ :

केज विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला होता. मुंदडा यांना 1,23,433 मते मिळाली तर साठे यांना 90,524 मते मिळाली अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा नमिता मुंदडा इच्छुक आहेत.

तर दुसरीकडे माजी आमदार संगीता ठोंबरे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही.

परळी विधानसभा मतदारसंघ :

2019 च्या निवडणुकीत परळीमध्ये मुंडे बहीण-भावात लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

यावेळी धनंजय मुंडे यांना 1,22,114 मते तर पंकजा मुंडे यांना 91,413 मते मिळाली होती. यावेळेस दोघेही महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधातील अद्याप शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही.

MLA of Beed District
Kolhapur BJP : समरजीत घाटगेंना भाजपकडून ऑफर? धनंजय महाडिकांनी वस्तुस्थिती सांगत दिले संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com