Shambhuraj Desai, Ajit Pawar
Shambhuraj Desai, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर, राष्ट्रवादी वाढली असती : शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

Satara News : महाविकास आघाडी Mahavikas Aghadi स्थापन झाली त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. पण, तसे झाले नाही. त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री Ajitdada झाले असते तर, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला पहायला मिळाला असता, असे विधान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी केले आहे.

2014 मध्ये मुख्यमंत्री पद जायला राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेतेच जबाबदार आहेत, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दुजोरा देत अजितदादांच म्हणणं योग्य आहे, असे म्हटले आहे.

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे महाविकास आघाडीत देखील ठरलं असावं. त्यांच्या सुत्राप्रमाणे विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे होते. ते का मिळू शकले नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

त्यावेळचे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार अजितदादाच होते. त्यानी पक्ष संघटना वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात.त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री झाले असते तर कदाचीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला पहायलं मिळाला असता.असे विधान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT